बांगलादेशचा भारताला मोठा धक्का, भारतीय निर्यातदारांसमोर मोठे आवाहन, थेट?

भारत आणि बांगलादेशचे संबंध तणावात आहेत. भारताविरोधात भूमिका घेताना बांगलादेश दिसत आहे. भारत हा बांगलादेशात तब्बल 40 टक्के कांदा निर्यात करतो. मात्र, आता भारताला मोठा धक्का बांगलादेशने दिला.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात दिसत आहेत. भारतात ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आमंत्रण असूनही बांगलादेशचे पंतप्रधान तारीक रहमान यांनी या परिषदेकडे पाठ फिरवली. भारत हा मोठ्या प्रमाणात कांदा बांगलादेशात निर्यात करतो. भारतीय कांद्यावर बांगलादेश अवलंबून आहे. मात्र, आता बांग्लादेश स्वत: कांदा उत्पादनात सक्षम होत आहे. कांद्याचे अतिरिक्त उत्पादन झाले. हेच नाही तर आता थेट श्रीलंकेच्या बाजारात बागंलादेश कांदा निर्यात करण्याच्या तयारीत आहे. हा भारतासाठी अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल.(Bangladesh) मिळालेल्या माहितीनुसार, कांदा निर्यातीच्या मुद्द्यात बांगलादेशचे शिष्टमंडळ श्रीलंकेत जाऊन आले. बांगलादेशला भारत 40 टक्के कांदा निर्यात करतो.

बांगलादेशचे शिष्टमंडळ श्रीलंकेत जाऊन बांगलादेशच्या स्थानिक व्यापाऱ्यांशी चर्चा करून कांदा पुरवठा चाचणी सुरू केली. बांगलादेश आता कांदा उत्पादनात पुढे निघून गेला. (Bangladesh) ज्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. भारताच्या कांदा निर्यात धोरणातील सततच्या हस्तक्षेपाचा हा परिणाम असल्याचा दावा केला जात आहे. यादरम्यान कांदा निर्यातदार सरकारवर गंभीर आरोप करत आहेत.

त्यांच्या म्हणण्यांनुसार, 2020 ते 2025 मध्ये पाच वर्षात केंद्र सरकारने कांदा निर्यात धोरणात 11 वेळा हस्तक्षेप केला. लादलेली निर्यातबंदी, तर कधी वाढवलेले निर्यात शुल्क (Bangladesh) यामुळे भारताच्या पांरपारिक परदेशी बाजारपेठांमधील धोरणांमुळे विश्वासार्हतेला तडे गेले. बांगलादेश हा भारताचा पारंपारिक ग्राहक आहे. भविष्यात भारतीय कांद्यासाठी परदेशी बाजारपेठा किती शिल्लक राहतील, असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

बांगलादेश आणि भारत यांच्यात मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. त्यातच भारत हा मोठा निर्यातदार आहे. मात्र, कांदा व्यापाऱ्यांना आता मोठा झटका बसला. बांगलादेशमध्ये कांद्याचे उत्पादन वाढताना दिसत आहे. हेच नाही तर बांगलादेशाचा कांदा थेट श्रीलंकेत पोहोचत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात जल करारही रखडला आहे. बांगलादेशची पाकिस्तानसोबत जवळीकता वाढली आहे. यासोबतच चीनचाही हात पकडण्याचा प्रयत्न बांगलादेशकडून केला जात आहे.

हेही वाचा : 

UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात?

‘हुपरी’ प्रकल्पातून आत्मनिर्भरतेचे पाऊल परकीय चलनात बचत?

भारत अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 लोकांना अटक, पोलिसांनी असं का केलं?