महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली असून ३० एप्रिल २०२६ ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांकडे आता (major update) फक्त दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे की, दिलेल्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास दरमहा मिळणारे १५०० रुपयांचे अनुदान थांबवले जाऊ शकते.

फडणवीस सरकारने सुमारे दीड वर्षांपूर्वी ही योजना सुरू केली होती. या योजनेतून राज्यातील कोट्यवधी महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. सध्या दोन कोटींहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र काही अपात्र लाभार्थी आणि गैरवापराच्या तक्रारी वाढल्यानंतर सरकारने ई-केवायसी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला.
सरकारने यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ दिली होती. तरीही अजूनही सुमारे २६ लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता ३० एप्रिलनंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी मानली जात आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यात अनेक महिला सेवा केंद्र, बँका आणि ऑनलाइन पोर्टलवर गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, लाभार्थी महिलांना मार्च महिन्याचे पैसे अद्याप मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिना संपत आला तरी एप्रिल महिन्याचे हप्तेही जमा झालेले नाहीत. आता मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये लवकरच खात्यात जमा होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे लाभार्थी महिलांनी विलंब न करता तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा
अरविंद केजरीवाल यांचा …….न्यायासाठी सत्याग्रह ?.
पोलादी सुरक्षा व्यवस्था …..जेव्हा भेदली जाते…
‘राजा शिवाजी’मधील लहान मुलाच्या त्या सीनवर कात्री सेन्सॉर बोर्डाने सुचवले हे मोठे बदल