गोकुळच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ होणार

कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून म्हैस आणि गाय दूध दरात वाढ होण्याची शक्यता आहे. दूध विक्री दरात प्रतिलिटर चार रुपये, तर दूध खरेदी दरात दोन रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत दूध विक्रेते आणि प्रमुख नेत्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. (Milk) नव्या दरांची अंमलबजावणी शनिवारपासून (ता. २१) होण्याची शक्यता आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे दूध संकलन आणि उपलब्धतेवर परिणाम होत असल्याने दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळ व्यवस्थापनानेही दरवाढीची चाचपणी सुरू केली आहे. गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी संचालकांशी चर्चा करून दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. (Milk) त्यानुसार म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये, तर विक्री दरात चार रुपये वाढ करण्याचा विचार आहे. मात्र, विक्री दरवाढीबाबत मुंबईतील वितरकांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

महायुतीचे संचालक आणि प्रमुख पदाधिकारी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. (Milk)तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांशीही दरवाढीबाबत चर्चा झाल्याचे समजते. गोकुळने प्रतिलिटर चार रुपयांची वाढ केल्यास दूध विक्री दरातील ही आतापर्यंतची सर्वाधिक एकरकमी वाढ ठरणार आहे. संचालकांशी चर्चा झाली असली तरी दरवाढीच्या अंतिम प्रस्तावावर नेत्यांशी चर्चा करून शिक्कामोर्तब केले जाणार आहे. येत्या दोन दिवसांत निर्णय होऊन शनिवारपासून नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले बस चालक अन् कंडक्टर निलंबित

लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

कुरुंदवाड न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू