कोल्हापूर-मुंबई दरम्यान दोन विशेष रेल्वे ५, ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनारक्षित गाड्यांचे नियोजन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दरम्यान दोन अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना मिरज, सांगलीसह मार्गावरील १५ प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. (Railway) त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

रेल्वे क्रमांक ०१४०२ कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही विशेष गाडी ५ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी कोल्हापूर येथून सुटेल. (Railway) दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी रेल्वे क्रमांक ०१४०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर ही गाडी ६ डिसेंबरला रात्री १० वाजून ३० मिनिटांनी मुंबईहून सुटेल.

दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल. या दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कऱ्हाड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर आणि हातकणंगले येथे थांबे देण्यात आले आहेत. या विशेष गाड्यांना एकूण १८ डबे असतील. यामध्ये १६ द्वितीय शयनयान, सामान्य द्वितीय श्रेणी व चेअर कारचे डबे तसेच दोन द्वितीय आसनांसह ‘गार्ड ब्रेक व्हॅन’चा समावेश आहे.

गाड्यांमधील अनारक्षित डब्यांची तिकिटे सामान्य दराने यूटीएस प्रणालीद्वारे उपलब्ध होतील. (Railway) तसेच प्रवाशांना रेलवन ॲपचाही वापर करता येणार आहे. या विशेष गाड्यांमुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि परिसरातील आंबेडकरी अनुयायी व प्रवाशांना सोयीचे होणार आहे. प्रवाहांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट