‘मिसिंग लिंक’ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. (Missing Link project) लोकार्पणानंतर हा मार्ग सर्वसामान्य वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला असून प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र, उद्घाटनानंतर काही तासांतच या प्रकल्पाला स्थानिक स्तरावर विरोध सुरू झाला आहे.

मावळ तालुक्यातील भूमिपुत्रांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित करून हा प्रकल्प उभारण्यात आला, मात्र त्याच मावळ तालुक्यातील नागरिकांना मिसिंग लिंकवर सहज प्रवेशाची सुविधा देण्यात आलेली नाही, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. विशेषतः लोणावळा आणि आसपासच्या भागातील नागरिकांसाठी या मार्गावर जाण्यासाठी कोणताही सोयीस्कर कायमस्वरूपी रस्ता नसल्याने स्थानिकांना या प्रकल्पाचा प्रत्यक्ष फायदा होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मनसेने दावा केला आहे की, मिसिंग लिंकमुळे वाहनचालक थेट पुढे जातील आणि त्यामुळे लोणावळा शहरातील पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. स्थानिक हॉटेल, दुकाने आणि पर्यटनाशी संबंधित उद्योगांवर याचा फटका बसण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारने हा प्रकल्प सुरू ठेवायचा असेल, तर लोणावळा आणि मावळ परिसरातील नागरिकांसाठी मिसिंग लिंकवर जाणारा स्वतंत्र आणि कायमस्वरूपी प्रवेशमार्ग तयार करावा, अशी ठाम मागणी मनसेने केली आहे. स्थानिकांच्या हिताचा विचार न करता विकास प्रकल्प राबवू नयेत, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी

मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?

 गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल