पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच मोठा थरार पाहायला मिळत असून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत रंगली आहे. (assembly elections) सुरुवातीच्या ट्रेंडनुसार राज्यात सत्तांतराचे संकेत दिसत असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यांच्या पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भवानीपूर मतदारसंघात त्या पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

भवानीपूरमध्ये भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी आघाडी घेतल्याचे चित्र असून नंदीग्राममध्येही ते जवळपास तीन हजार मतांनी पुढे असल्याचे ट्रेंडमध्ये दिसत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींसाठी ही सुरुवात धक्कादायक मानली जात आहे. सुवेंदू अधिकारी दोन्ही महत्त्वाच्या मतदारसंघांत आघाडीवर असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राज्यातील एकूण कलांवर नजर टाकल्यास भाजपने तृणमूल काँग्रेसवर किंचित आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार भाजप 116 जागांवर तर तृणमूल काँग्रेस 110 जागांवर पुढे असल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांमधील फरक अत्यंत कमी असल्याने पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या फेऱ्यांपर्यंत चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. काही ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या एजंटांमध्ये किरकोळ वाद झाल्याचे वृत्त आहे. प्रवेश नियम आणि व्यवस्थापनावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी सर्व केंद्रांवर मतमोजणी शांततेत सुरू आहे. पुढील काही तासांत पश्चिम बंगालचा अंतिम कौल स्पष्ट होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?