महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.(recruitment)सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागातील तलाठी पदांची भरती आता पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत होणार आहे. यामुळे पूर्वीच्या गोंधळ आणि गैरप्रकारांना पूर्णविराम मिळणार आहे.गेल्या काही वर्षांपासून तलाठी भरती प्रक्रिया वादात सापडली होती. अनेक तांत्रिक अडचणी आणि अनियमिताता समोर आल्याने स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी जोरदार मागणी केली होती की ही परीक्षा MPSC कडे सोपवावी. विद्यार्थ्यांच्य हिताचा विचार करत सरकारने ही जबाबदारी आता MPSC ला दिली आहे. यामुळे परीक्षेचा दर्जा उंचावेल आणि फक्त गुणवत्तेवर आधारित निवड होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

रिक्त जागांचा अहवाल ८ मे पर्यंत सादर करावा लागणार आहे. .(recruitment)भरती प्रक्रियेला वेग देण्यासाठी सरकारने प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना आपल्या विभागातील जिल्हानिहाय रिक्त तलाठी पदे आणि आरक्षण तपासून ८ मेपर्यंत शासनाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर प्रक्रिया वेगाने पुढे सरकणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व अहवाल आल्यानंतर MPSC लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करेल. सर्व काही ठरल्याप्रमाणे झाल्यास जुलै २०२६ मध्ये ही महाभरतीची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे.भरतीची काही मुख्य वैशिष्ट्ये सुद्धा अहेत. एकूण रिक्त पदे १७०० पेक्षा जास्त आहेत. PESA आणि बिगर PESA क्षेत्रासाठी स्वतंत्र जागांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे
तलाठी हे पद ग्रामीण भागातील प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ मानले जाते..(recruitment) गावातील महसूल कामे, जमिनीचे रेकॉर्ड, कर वसुली आदी जबाबदाऱ्या तलाठींकडे असतात. समाजात या पदाला विशेष प्रतिष्ठा आहे. त्यामुळे या भरतीसाठी प्रचंडड स्पर्धा अपेक्षित आहे. MPSC सारख्या विश्वासार्ह संस्थेमार्फत परीक्षा होणार असल्याने उमेदवारांना आता अधिक मेहनत आणि स्मार्ट अभ्यास करावा लागणार आहे. MPSC तलाठी भरती २०२६ ही महाराष्ट्रातील तरुणांसाठी खरोखरच जीवन बदलणारी संधी ठरेल.
हेही वाचा
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
महाराष्ट्रात संतापजनक प्रकार! भोंदूच्या नावाखाली १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; उपचाराच्या बहाण्याने
नसरापूर प्रकरण 2 प्रकरणातून निर्दोष सुटका होताच आरोपीने केली भयंकर गोष्ट, ज्यामुळे तपासात अडथळे