IPL 2026 फायनल बंगळुरूत नाही तर अहमदाबादमध्ये होणार!

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफ (held) सामन्यांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केलं आहे. यात बीसीसीआयने आयपीएल 2026 च्या फायनल सामन्याचं ठिकाण बदलण्यात आल्याचं स्पष्ट केलं तसेच त्यामागील कारण सुद्धा सांगितलं. इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या सीजनचा उदघाटन सामना आणि अंतिम सामना हा गट विजेत्या संघाच्या होमग्राउंडवर केला जातो. त्याप्रमाणे आयपीएल 2026 चा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं होम ग्राउंड असलेल्या एम चिन्नस्वामी स्टेडीयमवर आयपीएल 2026 चा फायनल सामना होणार होता. मात्र बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्लेऑफ सामन्यांच्या वेळापत्रकानुसार यंदा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या सीजनच्या प्लेऑफ सामान्यांचं (held) वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 26 मे रोजी क्वालिफायर 1 चा सामना हा धर्मशाला स्टेडियमवर पार पडेल. 27 मे रोजी पहिला एलिमिनिटर सामना हा न्यू चंदिगडच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल. तर दुसरा क्वालिफायर सामना हा 29 मे रोजी न्यू चंदिगडच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल. तर आयपीएल 2026 चा फायनल सामना हा 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल.

आयपीएल 2026 चा फायनल सामना हा गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं होम ग्राउंड असलेल्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर होणं अपेक्षित होतं. मात्र बीसीसीआयने हे ठिकाण बदललं असून त्यानुसार आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. याच कारण स्पष्ट करताना बीसीसीआयने आपल्या परिपत्रकात म्हटले की, काही ऑपेरेशनल आणि लॉजिस्टिकल बाबींमुळे आयपीएल 2026 च्या प्लेऑफ सामन्यांसाठी तीन ठिकाणं निश्चित करण्यात आलेली आहेत. योजनेनुसार फायनल सामना बंगळूरुमध्ये आयोजित होणार होता.

मात्र स्थानिक संघटना आणि प्रशासनाकडून आलेल्या काही अटी, (held) ज्या बीसीसीआयच्या स्थापित मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांच्या कक्षेबाहेर होत्या, त्यामुळे सामन्याचे ठिकाण बदलण्यात आलं असून दुसऱ्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं आहे.एएनआयने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, बंगळूरमधील राजकीय मुद्दे, विशेषतः आमदारकीच्या तिकिटांशी संबंधित मुद्द्यांमुळे, बीसीसीआयला चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल 2026 चा अंतिम सामना आयोजित करण्यात अडथळे निर्माण झाले होते. ज्यामुळे बीसीसीआयने फायनल सामन्याचं ठिकाण बदलण्याचं निर्णय घेतला.

हेही वाचा

मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार

महाराष्ट्रात संतापजनक प्रकार! भोंदूच्या नावाखाली १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; उपचाराच्या बहाण्याने

नसरापूर प्रकरण 2 प्रकरणातून निर्दोष सुटका होताच आरोपीने केली भयंकर गोष्ट, ज्यामुळे तपासात अडथळे