कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
पश्चिम बंगालच्या मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वतः विधानसभा (happening)निवडणुकीत पराभूत झालेल्या आहेत. त्यांच्या तृणमूल काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. भारतीय जनता पक्षाने प्रचंड यश प्राप्त केले आहे. तेथे आता भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. तथापि मुख्यमंत्री पदाचा आपण राजीनामा देणार नाही अशी ताठर भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतल्यामुळे घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला आहे आणि त्यामुळे तेथील राज्यपालांच्या कृतीकडे सबंध देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
ममता बॅनर्जी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आणि त्यामुळे संतप्त झालेल्या ममता दीदी यांनी वेगळीच आणि काहीशी आश्चर्यकारक भूमिका घेतली आहे. या निवडणुकीत आम्ही जिंकलो आहोत, आमचा नैतिक विजय झाला आहे, भाजपने दहशतीच्या मार्गाने, पैशाच्या जोरावर ही निवडणूक जिंकली असली तरी त्यांचा विजय आम्हाला मान्य नाही.

त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही (happening) असे ममता बॅनर्जी म्हणतात. त्या स्वतः निवडणूकीत पराभूत झालेल्या आहेत. त्यांच्या तृणमूल काँग्रेसचे संख्या बळ 100 च्या आत आले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी कोणती प्रतिक्रिया द्यावी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. निवडणूक लोकशाही मार्गाने झालेली नाही. कपटनीती वापरून आमचा पराभव करण्यात आला आहे हे मुद्दे त्या मांडू शकतात. त्यांना तो अधिकार आहे. पण मुख्यमंत्रीपदाचा आपण राज्यपालांकडे राजीनामा देणार नाही ही भूमिका मात्र अनाकलनीय आहे. आणि हे पहिल्यांदाच घडते आहे. अशा परिस्थितीत तेथील राज्यपाल कोणती भूमिका घेतात आणि कोणता निर्णय देतात इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वास्तविक निवडणुकीत पराभूत झालेल्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल यांच्याकडे राजीनामा देऊन नवीन बहुमताचे सरकार स्थापित करण्याचे सुचित केले जाते. राज्यपाल हे विधिमंडळाचे अधिवेशन बोलतात. आम्ही सरकार बनवू शकतो असा दावा करणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल हे नवीन सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करतात.
विधिमंडळ नेत्याने बहुमत सिद्ध केल्यानंतर नवीन सरकार घटनात्मक दृष्ट्या (happening) सत्तेवर येते. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत कोणी मिळवले आहे हे तेथील राज्यपालांना माहित आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेत्याला सरकार बनवण्यासाठी त्यांनी पाचारण करणे हे अभिप्रेत आहे. समजा तेथील राज्यपालांनी तृणमूल काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी पाचारण केले आणि विधिमंडळात बहुमत सिद्ध केले नाही तर भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्यासाठी राज्यपाल पाचारण करू शकतात. पण एकूण तेथील राजकीय परिस्थितीचे अवलोकन राज्यपालांनी केले तर ते मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राजीनामा देण्यास आदेश देऊ शकतात आणि हा आदेश मान्य केला गेला नाही तर मुख्यमंत्र्यांना ते पदच्युत करू शकतात. असे झाले तर ममता बॅनर्जी यांचा तो सर्वात मोठा अपमान ठरू शकतो. सलग पंधरा वर्षे मुख्यमंत्री पद भूषविलेल्या ममता बॅनर्जी यांनी सन्मानपूर्वक पद सोडणे आवश्यक आहे.
आपला आणि आपल्या तृणमूल काँग्रेसचा या निवडणुकीत दारुण पराभव का झाला याचे आत्म परीक्षण त्यांनी केले पाहिजे. विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत राहिले पाहिजे. गेलेली राजकीय पत, आणि गेलेले पद पुन्हा मिळवण्यासाठी आतापासूनच त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. या निवडणुकीत आपला नैतिक विजय झालेला आहे असे त्यांना मनापासून वाटत असेल तर तांत्रिकदृष्ट्या भारतीय जनता पक्षाचा विजय झालेला आहे हे त्यांनी मान्य करायला हवे. मुख्यमंत्री पदाचा मी राजीनामाच देणार नाही ही भूमिका लोकशाहीमध्ये कोणीही मान्य करणार नाही. श्रीमती इंदिराजी गांधी यांची खासदारकी उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर, त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देणे आवश्यक होते, मात्र त्यांनी न्यायालयाचा निकालच मान्य केला नाही.
परिणामी त्यांच्या राजकीय आयुष्यात नंतर काय घडले हे साऱ्या देशवासियांना माहित आहे. इंदिराजी गांधी यांची लोकसभेवर झालेली निवड बेकायदा ठरवली होती. इथे तर ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या सर्वसामान्य मतदारांनीच नाकारले आहे हे इथे लक्षात घेतले पाहिजे.
हेही वाचा
मोठी बातमी! राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जी यांना अटक होणार?
‘गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांत घ्या’ सुप्रिम कोर्टाचे आदेश
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार