भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या बाद (Announced) फेरीचे म्हणजेच प्लेऑफचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. सध्या लीग टप्प्यातील चुरस सुरू असून, मे महिन्याच्या अखेरीस विजेतेपदासाठीचा अंतिम संघर्ष पाहायला मिळणार आहे. यंदा प्लेऑफचे सामने धरमशाला, न्यू चंदीगड आणि अहमदाबाद या तीन शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.आयपीएल २०२६ चा लीग टप्पा २४ मे रोजी समाप्त होईल. त्यानंतर अवघ्या एका दिवसाच्या विश्रांतीनंतर बाद फेरीला सुरुवात होईल. प्लेऑफचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

क्वालिफायर १ : २६ मे २०२६ – धरमशाला
एलिमिनेटर : २७ मे २०२६ – न्यू चंदीगड
क्वालिफायर २ : २९ मे २०२६ – न्यू चंदीगड
अंतिम सामना : ३१ मे २०२६ – अहमदाबाद
अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम पुन्हा एकदा ऐतिहासिक अंतिम (Announced)सामन्याचे साक्षीदार ठरणार आहे. विशेष म्हणजे, २०२५ च्या हंगामाचा अंतिम सामनाही याच मैदानावर पार पडला होता, जिथे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने आपले पहिले विजेतेपद पटकावून इतिहास रचला होता.आयपीएलच्या प्रस्थापित नियमांनुसार, गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर अंतिम सामन्याचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे यंदाचा अंतिम सामना बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक संघटना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या काही अटी बीसीसीआयच्या नियमावलीत बसत नसल्यामुळे ऐनवेळी हे स्थळ बदलण्यात आले आहे.
बीसीसीआयने स्पष्ट केले की, बंगळूरुमधील काही तांत्रिक आणि (Announced) स्थानिक नियमांमुळे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे कठीण जात होते. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची सोय आणि स्पर्धेची भव्यता लक्षात घेऊन पुन्हा एकदा अहमदाबादची निवड करण्यात आली आहे. धरमशाला आणि चंदीगड सारख्या मैदानांवर पहिल्यांदाच प्लेऑफचे महत्त्वाचे सामने होणार असल्याने उत्तर भारतातील क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जी यांना अटक होणार?
‘गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांत घ्या’ सुप्रिम कोर्टाचे आदेश
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार