अनेकांना कमरेच्या किंवा पाठीच्या भागात अचानक वेदना सुरू झाल्या (symptoms) की ती साधी पाठदुखी आहे की किडनी स्टोनची समस्या, हे समजत नाही. दोन्ही त्रासांमध्ये वेदना होत असल्या तरी त्यामागची कारणे आणि लक्षणे वेगवेगळी असतात. त्यामुळे योग्य वेळी फरक ओळखणे महत्त्वाचे ठरते.साधारण पाठदुखीमध्ये दीर्घकाळ बसणे, चुकीची बसण्याची पद्धत, वजन उचलणे किंवा स्नायूंवर ताण आल्यामुळे वेदना होतात. ही वेदना बहुतेक वेळा एका ठिकाणी जाणवते आणि हालचाल केल्यावर वाढू शकते. आराम केल्यावर किंवा औषध घेतल्यावर ती कमीही होते.

मात्र किडनी स्टोनमुळे होणारी वेदना अधिक तीव्र असते. (symptoms)ही वेदना पाठीच्या खालच्या बाजूला किंवा कमरेच्या एका बाजूला सुरू होऊन पोटाकडे किंवा जांघेकडे पसरू शकते. अनेकदा वेदनेसोबत लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी लागणे, मळमळ, उलटी किंवा लघवीत रक्त दिसणे अशी लक्षणेही जाणवतात.
तज्ज्ञांच्या मते, किडनी स्टोनची वेदना अचानक सुरू होते आणि (symptoms)ती लाटांप्रमाणे वाढत-घटत राहते. तर सामान्य पाठदुखीमध्ये शरीराची हालचाल, बसण्याची पद्धत किंवा झोपण्याच्या स्थितीमुळे वेदना बदलते.आरोग्य तज्ज्ञ सांगतात की सतत वेदना होत असल्यास किंवा वेदनेसह ताप, उलटी, लघवीत बदल अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये. वेळेत तपासणी केल्यास गंभीर समस्या टाळता येऊ शकतात.
हेही वाचा
मोठी बातमी! राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जी यांना अटक होणार?
‘गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांत घ्या’ सुप्रिम कोर्टाचे आदेश
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार