महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा (result) निकाल नुकताच जाहीर झाला असून, आता सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल येत्या 9 मे 2026 रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे.दहावीच्या निकालाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व विभागीय मंडळांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे आणि गुण नोंदणीचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. सध्या केवळ तांत्रिक पडताळणी आणि निकाल सर्व्हरवर अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

शिक्षण मंडळाच्या परंपरेनुसार, बारावीच्या निकालानंतर (result)साधारणपणे १५ ते २० दिवसांच्या अंतराने दहावीचा निकाल लागतो. मात्र, यंदा ही प्रक्रिया अधिक वेगाने राबवली जात आहे. सूत्रांच्या हवाल्यानुसार, मंडळाने ९ मे ही तारीख निकालासाठी प्रस्तावित केली असून, तांत्रिक बाबी वेळेत पूर्ण झाल्यास त्याच दिवशी अधिकृत घोषणा केली जाईल.महाराष्ट्र बोर्डाचा असा नियम आहे की, निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी मंडळाकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले जाते. यामध्ये निकालाची तारीख आणि अचूक वेळ सहसा दुपारी १ वाजता जाहीर केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे.यावर्षी दहावीच्या परीक्षेला महाराष्ट्रातून सुमारे १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पेपर तपासणीत अधिक पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. निकालाची टक्केवारी यंदा सुधारण्याची चिन्हे असून, अंतर्गत गुणांचे संकलनही वेळेत पूर्ण झाले आहे.
निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थी खालील सोप्या (result) पद्धतीने आपला गुणतक्ता पाहू शकतात:
सर्वात आधी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in जा.
होमपेजवर ‘SSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव अचूक टाका.
‘View Result’ बटणावर क्लिक करताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा.
निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबद्दल शंका आहे, त्यांच्यासाठी गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील, त्यांच्यासाठी जुलै-ऑगस्टमध्ये ‘पुरवणी परीक्षा’ घेतली जाईल, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.
हेही वाचा
मोठी बातमी! राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जी यांना अटक होणार?
‘गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांत घ्या’ सुप्रिम कोर्टाचे आदेश
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार