चलनवाढ आणि महागाईमुळे पैशाची किंमत कमी होते.(value) तुमच्याकडे सध्या 1 कोटी रुपये असतील तर 10 वर्षांनंतर त्याची खरी किंमत किती असेल? याचा कधी विचार केला आहे का? याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सध्याच्या घडीला 1 कोटी ही मोठी रक्कम आहे. जर (value)तुमच्याकडे आज 1 कोटी रुपये असतील तर 10 वर्षांनी त्याची किंमत किती असेल? जास्त असेल की कमी असेल? हे जाणून घेऊयात.

महागाईमुळे पैशाची खरेदी करण्याची शक्ती कालांतराने कमी होते. याला चलनवाढ म्हणतात. यामुळे आजच्या एक कोटी रुपयांची किंमत निश्चितच कमी झालेली आहे.

इथून पुढे वार्षिक महागाई दर 6% आहे असे गृहीत धरले तर, 10 वर्षांनी 1 कोटी रुपयांचे मूल्य अंदाजे 55 ते 60 लाख रुपये असेल. यात 40 टक्के पेक्षा जास्त कपात झालेली असेल.

महागाई दर 7-8% ने वाढला तर किंमत आणखी वेगाने कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही फक्त पैसे साठवण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी धोक्याचे असेल, कारण दिवसेंदिवस पैशांचे मूल्य कमी होत जाईल.

त्यामुळे पैसे साठवण्याऐवजी गुंतवणूकीवर भर देणे गरजेचे आहे. तुम्ही स्टॉक, म्युच्युअल फंड, पीपीएफ किंवा सोने यांसारखे गुंतवणूक करु शकता. यामुळे तुमच्या पैशाचे मूल्य वाढू शकते.

हेही वाचा :

29 की 30 सप्टेंबर नेमकी कधी आहे अष्टमी तिथी, 
प्रभासच्या ‘द राजा साब’ चा थराराक ट्रेलर रिलीज;
पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर,