पुण्यातील या मंदिराला सर्व भागांतून भाविक मोठ्या संख्येने (Navratri)भेट देतात. ‘इच्छापूर्ती करणारी देवी’ अशी श्रद्धा असल्याने दरवर्षी नवरात्री महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

राजस्थानमधील नागौर येथून कामाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर नाहर समाज पुण्यात स्थायिक झाला असून, सुमारे ४०० कुटुंबीय आज येथे वास्तव्यास आहेत. या समाजाची (Navratri)कुलमाता असलेली श्री चामुंडा भवानी माता यांचे भव्य मंदिर २०१८ मध्ये कात्रज-भिलारेवाडी येथे बांधून प्रतिष्ठापित करण्यात आले. मंदिरात चामुंडा भवानी माता, महालक्ष्मी आणि सरस्वती देवीची सुंदर मूर्ती आहे. यापूर्वी देवीचे मंदिर फक्त नागौर येथील राजवाड्यात होते. तब्बल १०२५ वर्षांनंतर प्रथमच पुण्यात देवीची मूर्ती प्रतिष्ठापना झाली असून, त्यानंतर संपूर्ण भारतभरातील नाहर समाज एकत्र येऊन नागौरमध्येही भव्य मंदिर उभारले गेले. पुण्यातील या मंदिराला सर्व भागांतून भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. ‘इच्छापूर्ती करणारी देवी’ अशी श्रद्धा असल्याने दरवर्षी नवरात्री महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
दहा दिवसांचे धार्मिक विधी
यावर्षी नवरात्रोत्सवाचे सातवे वर्ष असून, या काळात दररोज सतचंडी हवन, १०० सप्तशती पाठ, तसेच दररोज सायंकाळी दांडिया कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. अष्टमी आणि नवमीला विशेष धार्मिक विधी होणार असून, ‘माता की चौकी’ हा भव्य कार्यक्रमही यावर्षी भाविकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
महिलांसाठी विशेष सन्मान
समाजातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आदर्श माता पुरस्कार’ व ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. या निमित्ताने महिला मोठ्या संख्येने सहभागी होत असून, समाजातील ऐक्य आणि उत्साह वृद्धिंगत होत आहे.
सामाजिक उपक्रमांवर भर
फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत नाहर समाज वर्षभर विविध उपक्रम राबवत असतो. या नवरात्रोत्सवातही अंध कुटुंबांना, अनाथ मुलांना मदत केली जाणार आहे. यामुळे पुण्यातील समाजजीवनात नाहर समाजाचे योगदान लक्षणीय ठरत आहे.
या सर्व उपक्रमांची माहिती नाहर समाजाचे अध्यक्ष राजेश नाहर, उपाध्यक्ष श्रीकांत नाहर, संपत नाहर, खजिनदार सुभाष नाहर व महिला अध्यक्ष अंजली अभय नाहर यांनी दिली.
पर्यावरणाशी एकनिष्ठ ‘नवदुर्गा’
वन्यजीव आणि इतर प्राणी बचाव कार्य मोहीमांमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून समर्पितपणे कार्य करणाऱ्यांमध्ये ‘नेहा पंचमीया’ यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. प्राण्यांवर डोळस प्रेम करणाऱ्या नेहा यांनी २००७ मध्ये प्राण्यांच्या बचाव कार्यासाठी ‘रेस्क्यू चारिटेबल ट्रस्ट’ या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सक्रिय प्राणी बचाव संस्थेची स्थापना केली. याची सुरुवात एका साध्या फोन कॉलने झाली.
एका नागरिकाने जखमी प्राणी पाहिला आणि त्याला मदतीसाठी कोणाला बोलवायचे हेच कळत नव्हते. त्या क्षणी नेहांना जाणवले की प्राण्यांच्या आपत्कालीन सेवेत मोठी पोकळी आहे. त्यांनी दुर्लक्ष न करता पावले उचलली आणि रेस्क्यूची सुरुवात झाली. काही जखमी प्राण्यांची सुटका करण्यापासून सुरुवात झालेला त्यांचा प्रवास वयाच्या केवळ २३व्या वर्षी एका मोठ्या ध्येयामध्ये रुपांतरित झाला. याची पायाभरणी २००७ मध्ये झाली. पण २०१६ नंतर या संस्थेला एक व्यावसायिक आणि संरचित असे स्वरूप मिळाले. त्या काळात नेहा आणि त्यांच्या टीमने नवीन केंद्र सुरू केले, प्रणाली विकसित केल्या, प्रशिक्षित टीम तयार केली आणि संकटात सापडलेल्या प्राण्यांसाठी सुरक्षित जागा निर्माण केली.
हेही वाचा :
गरबा म्हणजे नक्की काय ?
झोपेतून उठल्यानंतर कायमच चक्कर येते?
आज नवरात्रीची महाअष्टमी राशींसाठी भाग्यशाली!