फेब्रुवारी सुरू होताच बाजारपेठेत गुलाबांच्या रंगांनी वातावरण रोमँटिक होतं (Rose)आणि प्रेम व्यक्त करण्याची तयारी अनेकजण करताना दिसतात. याच काळात व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात होते, आणि त्याचा पहिला दिवस म्हणजे Rose Day. पण हा आठवडा गुलाब देण्याच्या दिवसानेच का सुरू होतो, यामागे एक खास परंपरा आणि भावना दडलेल्या आहेत.दरवर्षीप्रमाणे 2026 मध्येही Rose Day 7 फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. यंदा हा दिवस शनिवारी येत असल्याने प्रेमी जोडप्यांसाठी तो अधिक खास ठरण्याची शक्यता आहे. शनिवार असल्यामुळे अनेकांना आपल्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. फिरायला जाणे, भेटवस्तू देणे किंवा फक्त एकमेकांसोबत शांत वेळ घालवणे यासाठी संपूर्ण वीकेंड मिळू शकतो.

Rose Day हा व्हॅलेंटाइन वीकमधील पहिला टप्पा मानला जातो.(Rose) या दिवशी गुलाब देऊन भावना व्यक्त केल्या जातात, कारण शब्दांपेक्षा फुलांमधून भावना अधिक सहज आणि सुंदरपणे पोहोचतात, अशी समजूत आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक तरुण-तरुणी या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहत असतात आणि आपल्या प्रिय व्यक्तीला खास गुलाब देऊन प्रेम व्यक्त करतात.प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात गुलाबाने का होते, यामागे इतिहासात 19 व्या शतकातील एक प्रचलित पद्धत कारणीभूत मानली जाते. त्या काळात फुलांच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याची परंपरा लोकप्रिय झाली होती. गुलाबाला प्रेम, आकर्षण आणि नात्यांमधील कोमलतेचं प्रतीक समजलं गेलं. त्यामुळेच व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात गुलाब देण्याच्या दिवसाने केली जाते, अशी धारणा तयार झाली.

गुलाबांच्या रंगांनुसार त्यांच्या अर्थांमध्येही फरक असतो.(Rose) लाल गुलाब गहिरं प्रेम आणि उत्कट भावना व्यक्त करतो, त्यामुळे तो प्रिय व्यक्तीसाठी दिला जातो. पिवळा गुलाब मैत्री आणि आनंदाचं प्रतीक आहे, तर गुलाबी गुलाब आदर, कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. पांढरा गुलाब शांतता, पवित्रता आणि नव्या सुरुवातीचा संदेश देतो, तर नारंगी गुलाब आकर्षण, उत्साह आणि भावनिक ओढ दर्शवतो. यामुळे Rose Day केवळ फुलं देण्याचा दिवस न राहता, नात्यांमधील भावना वेगवेगळ्या रंगांतून व्यक्त करण्याची एक सुंदर संधी ठरतो.

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी