गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोनं-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.(gold)सोन्याचे दर हे गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर चांदीदेखील महागली आहे. जागतिक मागणीत वाढ आणि डॉलर कमकुवत झाल्याने चांदीच्या किंमतीत विक्रमी 7 हजारांची वाढ होत चांदी दीड लाखांवर पोहोचली आहे. या सगळ्या कारणांमुळं सोनं-चांदी खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेली आहे. ज्या ग्राहकांनी सोनं -चांदीत गुंतवणुक केली आहे. त्यांना गेल्या 9 महिन्यात 56 टक्के ते 75 टक्के परतावा मिळाला आहे.

चांदीत 74.6 % परतावा
जानेवारीत प्रतिकिलो चांदीची – किंमत 85,913 रुपये होती. (gold)सप्टेंबरअखेर ती झेपावत 1,50,000 रुपयांवर पोहोचली. म्हणजेच चांदीने गुंतवणूकदारांना जवळपास
75% परतावा दिला आहे.
चांदीचा वापर सुरक्षित गुंतवणुकीबरोबरच औद्योगिक कामासाठीदेखील होतो. चांदीचा वापर सोलर पॅनल, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हिकल्समध्ये जास्त वापर केला जातो. (gold)हाच फॅक्टर चांदीला ग्रीन एनर्जी आणि टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. तज्ज्ञांच्या मते, चांदीची दुहेरी भूमिका असल्यामुळं किमत आणि औद्योगिक धातु असल्यामुळं गुंतवणुकदारांनी यात गुंतवणुक केली आहे.

चांदीचे भाव किती वाढणार?
यावर्षात चांदीची किंमत 60 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.(gold) तर सोनं या दरम्यान 45 टक्क्यांनी उसळले आहे. चांदी लवकरच 1,50,000 ते 1,70,000 प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते. सध्या चांदीचा भान 1.43 लाख प्रति किलोवर आहे. याचा अर्थ जवळपास चांदीच्या दरात 5 ते 19 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय मागणी आणि भारतात रुपया कमकुवत झाल्यामुळं चांदीच्या किंमती भविष्यात आणखी वाढू शकतात. मात्र जर रुपया वधारला किंवा व्याजदरासंदर्भात काही अपडेट समोर आली तर कमी कालावधीत चांदीच्या दरात घसरण येऊ शकते.
हेही वाचा :
SUV खरेदी करायचीये का?
आजचे 1 कोटी 10 वर्षांनी किती होणार,
बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म;