कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
नेहमीच्या ताणतणावातून मुक्त होण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून माणूस (doorstep)परमेश्वराच्या पायाशी लिन होतो. कुणी बालाजी तिरुपतीच्या दर्शनासाठी तर कोणी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी जातो. सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. महाराष्ट्रातील नऊ दुर्गांच्या दर्शनासाठी विविध शहर आणि ग्रामीण भागात भाविकांच्या भक्तीचा कल्लोळ सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी भक्तांचा आणि भक्तीचा महापूर आलेला आहे. नऊ दुर्गांना या निमित्ताने भाविक महिलांच्या कडून साडी चोळी अर्पण केली जाते. त्यामुळे साडी चोळी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. करवीर निवासिनी अंबाबाईचे प्राचीन मंदिरही त्याला अपवाद नाही.

यंदाच्या नवरात्र उत्सवात साडी विक्रेत्यांकडून महिला भक्तांना फसवले जात (doorstep)असल्याचा गंभीर प्रकार अगदी अनपेक्षितपणे उघडकीस आला. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दारात फसवणुकीचा धंदा जोरात असे या प्रकारावरून म्हणता येईल.महाबळेश्वर पाचगणी येथून करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी काही महिला रविवारी कोल्हापुरात आल्या होत्या. भाऊसिंगजी रोडवर गुजरी कॉर्नर येथे श्री तानाजी पाटील हे अध्यक्ष असलेल्या शिवप्रेमी तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या दुर्गा मातेला अर्पण करण्यासाठी महाबळेश्वर पाचगणी येथील एका महिलेने भवानी मंडप परिसरातील एका दुकानातून दोनशे रुपयांची साडी खरेदी केली होती.
अंबाबाईचेच एक प्रतीक आहे म्हणून त्या महिलेने ती साडी दुर्गा मातेला अर्पण केली. ही साडी या दुर्गा मातेच्या खांद्यावर पसरून ठेवा अशी तिने विनंती केली.म्हणून ही साडी बंदिस्त कागदी आवरणातून बाहेर काढण्यात आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्या कागदी आवरणाखाली साडी म्हणून चक्क अर्ध्या मीटरचा हिरव्या कापडाचा एक तुकडा ठेवण्यात आला होता. संबंधित महिलेला खूप वाईट वाटले. (doorstep)तिने आपली फसवणूक झाल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. म्हणून मग मंडळाचे कार्यकर्ते भवानी मंडप परिसरातील दुकानदाराकडे गेले आणि त्याला या फसवणुकीबद्दलचा जाब विचारला. तेव्हा त्याने काहीही न बोलता दोनशे रुपये त्या महिलेला परत दिले.
नवरात्र उत्सवा त किंवा इतर वेळी सुद्धा करवीर निवासिनी अंबाबाईला त्यांच्याकडून साडी चोळी अर्पण केली जाते. मंदिरातील श्री पुजकांकडून ही साडी आहे तशी स्वीकारली जाते.(doorstep)ती उलघडून बघितली जात नाही. सहावारी किंवा नऊवारी साडी असल्याचे भासवण्यासाठी एक मीटर किंवा अर्ध्या मीटरचा कापडाचा तुकडा अशा पद्धतीने कागदामध्ये गुंडाळला जातो की आत मध्ये साडीच आहे असा भास होतो. प्रत्यक्षात मात्र साडीच्या तुकड्यावर कागदाची रद्दी पसरली जाते आणि ती अशा पद्धतीने बांधली जाते की आत मध्ये साडी आहे असे दिसले पाहिजे.
मंदिर परिसरात अशा प्रकारची साडी विक्रीची अनेक दुकाने असतात किंवा आहेत. भाविक महिला मनामध्ये भक्ती भाव ठेवून अशा प्रकारच्या साड्या विकत घेतात. (doorstep)सहसा त्या उघडून बघितल्या जात नाहीत. अंबाबाईच्या पायावर साडी ठेवली की भाविक महिलांचे मन भरून येते.नवरात्र उत्सवानिमित्त अंबाबाईच्या दर्शनासाठी स्त्री-पुरुष भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली असते. भल्या मोठ्या लांब लांब रांगा लागलेल्या असतात. या गर्दीत आणि दर्शन घेण्याच्या घाई गडबडीत अंबाबाईला साडी चोळी अर्पण करणे कठीण होते म्हणून मग अनेक भाविक महिला शहरातील नवदुर्गांना त्या साड्या अर्पण करतात.
दुर्गा मातेच्या मूर्तीला या भाविक महिला अंबाबाईच्या रूपातच पाहत असतात. रविवारी रात्री याच मानसिकतेतून, याच भावनेतून महाबळेश्वर पाचगणी येथून आलेले त्या महिलेने शिवप्रेमी तरुण मंडळाच्या दुर्गा मातेच्या चरणी विकत घेतलेली साडी अर्पण केली. ही साडी उलघडून दुर्गा मातेच्या पाठीवर पसरून ठेवावी अशी तिन्ही विनंती केली.(doorstep) म्हणून मग कागदामध्ये असलेली हिरव्या रंगाची साडी बाहेर काढली तेव्हा ती साडी नसून चक्क अर्ध्या मीटरचा कापडाचा तुकडा असल्याचे लक्षात आले.कोल्हापुरात अंबाबाई मंदिर तसेच भवानी माता मंदिर परिसरात साडी विक्रेत्यांकडून अशा प्रकारची घोर फसवणूक होते. परिणामी कोल्हापूरची बदनामी होते.
अशी महाराष्ट्रात सर्व दूर कोल्हापूरची बदनामी करणाऱ्या या साडी विक्रेत्यां विरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. भाविकांच्या भावनेशी प्रतारणा करणाऱ्या या साडी विक्रेत्यांच्या नफेखोरीला काय म्हणावे? मंदिर परिसरात असे पाप करणाऱ्या साडी विक्रेत्यांकडून एक प्रकारची धार्मिक विटंबनाच केली जाते असे म्हणावे लागेल. शिवप्रेमी तरुण मंडळाच्या वतीने संबंधित साडी विक्रेत्या व्यापाऱ्यांच्या विरुद्ध सोमवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात एका निवेदनाच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्यात आली असली तरी संबंधितांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल का हा भाविकांना पडलेला प्रश्न आहे. (doorstep)करवीर निवासिनी अंबाबाईच्या कोल्हापुरात हा फसवणुकीचा एक नवा फंडा अनपेक्षित पणे पुढे आला असला तरी अशा प्रकारची फसवणूक पूर्वीपासूनच केली जात असेल यात शंका नाही. कोल्हापूर प्रमाणेच भाविकांची महाराष्ट्रातील अनेक मंदिरात अशाच प्रकारची भाविकांची गर्दी उसळलेली असते.
मग ती मुंबईची मुंबादेवी असो, नाशिक मधील सप्तशृंगी, पुण्यातील चतुशृंगी, माहूरगडची रेणुका, अमरावतीची एकविरा वज्रेश्वरी अशा अनेक नवदुर्गांच्या मंदिर परिसरात अशाच प्रकारच्या साड्यांची विक्री करणारी छोटी मोठी दुकाने असतील. या सर्वच ठिकाणी पूर्ण लांबीची साडी म्हणून ब्लाउज पीस ठेवले जाते आणि त्याच्यावर कागदाचे आवरण घालून ते भाविकांना दिले जाते असे नाही. पण कोल्हापुरात उघडकीस आलेल्या फसवणुकीच्या या प्रकारामुळे इतर शहरात आणि जिल्ह्यात अशीच फसवणूक केली जात नसेल कशावरून? (doorstep)हा प्रश्न भाविकांना पडणे स्वाभाविक आहे. 20 रुपयांचा ब्लाऊज पीस, कागदाचे जाड आवरण घालून साडी म्हणून दोनशे रुपयांना विकणे हा फसवणुकीचा प्रकार आहे आणि तो धार्मिक ठिकाणी घडत असल्यामुळे त्याचे गांभीर्य कितीतरी पटीने वाढते.

वास्तविक करवीर निवासिनी अंबाबाईच्या दारात फसवणुकीचा धंदा जोरात चालत असेल आणि तो अनपेक्षित पणे उघडकीस येत असेल तर शहरातील इतर व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे. कारण फसवणुकीच्या या गुन्ह्यामुळे कोल्हापूरची बदनामी राज्यात राज्याबाहेर होऊ शकते.(doorstep) कोल्हापूर हे इथे फसवणुकीसाठी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात
उल्लेखित करण्यात आले आहे. अशाप्रकारे भाविकांच्या भावनांशी खेळले जात असेल तर भाविकांनी साडी ऐवजी स्वतःला सात्विक समाधान मिळेल असे पर्याय निवडले पाहिजेत.
हेही वाचा :
SUV खरेदी करायचीये का?
आजचे 1 कोटी 10 वर्षांनी किती होणार,
बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म;