कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

“आय लव्ह मोहम्मद”हे वाक्य यापूर्वी महाराष्ट्रात कधी उच्चारले जात नव्हते,(digital)तसेच डिजिटल फलक कुठे लावले गेले नव्हते. नुकत्याच झालेल्या ईद-ए-मिलाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या आणि तसेच डिजिटल फलकही लावले गेल्यामुळे”आय लव्ह महादेव”अशा घोषणांनी तसेच लावलेल्या फलकांनी हिंदुत्ववादी संघटनांनी त्याला प्रत्युत्तर दिले. अशा एकूण पार्श्वभूमीवर सोमवारी अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर येथे वातावरण कमालीचे तणावग्रस्त बनले होते. अहिल्या नगरच्या कोटला भागात तर पोलिसांना प्रक्षोभक जमावावर लाठी हल्ला करावा लागला. एम आय एम संघटनेचे खासदार ओवेसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या‌ दौऱ्यामुळे कोल्हापूर शहरातही काही भागात तणावपूर्ण वातावरण होते

मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध एसटी, बंजारा विरुद्ध वंजारी, धनगर विरुद्ध आदिवासी असे काही जातकलह गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू आहेत. शिवराळ भाषा सुरू आहे, धमक्या दिल्या जात आहेत, वाहनांवर हल्ले केले जात आहेत. परस्पर विरोधी जातीय परिषदा घेतल्या जात आहेत. (digital)कुठे धरणे आंदोलन तर कुठे आमरण उपोषण असे काही चालू आहे. या जातकलहातून महाराष्ट्रात अस्वस्थ वातावरण आहे.महाराष्ट्राचा एक मोठा भाग असलेला मराठवाडा जलमय झाला आहे. तेथील शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा आक्रोश सुरू आहे. अशा प्रकारचे अस्मानी संकट आलेले असताना खरे तर “जातकलह’बाजूला जाणे आवश्यक होते. पण काही राजकारण्यांना आपल्या अस्तित्वासाठी हे जातकलह हवे आहेत. या जातकल हात अडकलेल्या नेत्यांना मराठवाड्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही. एक चित्र दुर्दैवी आहे.

हे कमी आहे म्हणून की काय, “आय लव्ह मोहम्मद”आणि “आय लव्ह महादेव”हा एक नवीनच संवेदनशील विषय सुरू करण्यात आलेला आहे. अहिल्यानगरच्या कोटला भागात कोणीतरी रस्त्यावर रांगोळी काढून त्यातून धर्मगुरूची विटंबना केल्याचा प्रकार घडला आहे.हे ज्याने कोणी केले त्याला पोलिसांनी त्वरित अटकही केली आहे. पण नंतर अल्पसंख्यांक समाजाने रास्ता रोको आंदोलन केले.दगडफेक केली. त्यांच्या या ॲक्शनची हिंदू बहुलभागात रिएक्शन उमटली. हिंसक बनलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना मग लाठी हल्ला करावा लागला. (digital)बळाचा वापर करावा लागला. अहिल्यानगर मधील घटनेचे पडसाद छत्रपती संभाजी नगरच्या एका भागात उमटले पण पोलिसांनी आपले कौशल्य वापरून परिस्थिती चिघळू दिली नाही.सोमवारी अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील वातावरण तंग झालेले असतानाच एम आय एम चे खासदार ओवेसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आल्यामुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसर आणि बागल चौक परिसर येथे वातावरण तंग बनले होते. तथापि ओवेसी यांनी एम आय एम च्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी बागल चौक परिसरात येणे टाळले त्यामुळे तेथील तणाव निवळला.

ओवेसी आणि जलील यांची पत्रकार परिषद मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील हॉटेल क्युबिक येथे दुपारी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे तेथे परस्पर विरोधी जमाव जमला होता. (digital)मात्र ओवेसी हे पत्रकार परिषदेकडे फिरकले नाही मात्र इम्तियाज जलील यांची पत्रकार बैठक झाली.एम आय एम ही संघटना अति जहाल समजली जाते. या संघटनेचे संबंध काही दहशतवादी गटांची असल्याची तेव्हा म्हणजे काही वर्षांपूर्वी चर्चा होती.एम आय एम या संघटनेची शाखा कोल्हापुरात काढण्याचा पूर्वी एकदा प्रयत्न झाला होता पण हिंदुत्ववादी संघटनांनी आणि स्थानिक मुस्लिम नेत्यांनी तो यशस्वी होऊ दिला नव्हता. खासदार ओवेसी यांनीही यापूर्वी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येण्याचा तीन वेळा प्रयत्न केला होता पण त्यांच्या आगमनामुळे कोल्हापुरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल म्हणून स्थानिक प्रशासनाने त्यांच्यावर कोल्हापूर बंदीचा आदेश काढला होता.आता एम आय एम संघटने विरोधातील धार कमी झाली आहे. या संघटनेने ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तान विरोधी घेतलेली कठोर भूमिका ही स्वागतार्हच होती.एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही जणांना महाराष्ट्र अशांत
करावयाचा आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

हेही वाचा :

SUV खरेदी करायचीये का? 

आजचे 1 कोटी 10 वर्षांनी किती होणार,

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म;