कोल्हापूरला हादरवून टाकणारं एक विचित्र हत्याकांड हातकणंगणल्यात घडलं आहे.(stream) तालुक्यामधील भादोले गावामध्ये सोमवारी रात्री घडली आहे. पतीनेच आपल्या पत्नीला संपवलं असून कोयत्याने सपासप वार करुन तिची हत्या केली आहे. आरोपीचं नाव प्रशांत मारुती पाटील असं असून मयत महिलेचं नाव रोहिणी पाटील असं आहे. 29 वर्षीय रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकून ती बेसावध असतानाच प्रशांतने तिच्या डोक्यावर आणि मानेवर कोयत्याने वार करुन तिला निर्दयीपणे संपवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आठ वर्षांपूर्वी प्रशांत आणि रोहिणीचा विवाह झाला होता. त्या दोघांना दोन मुली आहेत. एक सहा आणि एक तीन वर्षांच्या मुलीसहीत हे दोघे भादोले गावात वास्तव्यास होते. मात्र मागील काही काळापासून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडायचे. प्रशांतचं दुचाकीचं गॅरेज आहे. रोहिणीचे वडील मागील काही काळापासून आजारी असल्याने ती वारंवार वाळवा तालुक्यातील आपल्या माहेरच्या गावी म्हणजेच ढवळीला जायची. हाच या दोघांमधील वादाचा महत्त्वाचा विषय असायचा.

सोमवारी सायंकाळी प्रशांत आणि रोहिणी ढवळीवरुन सायंकाळी भादोल्याकडे परत येत होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वारणा नदीवरला पूल ओलांडल्यानंतर गावाजवळच्या ओढ्यापासून काही अंतरावर दुचाकी थांबवली. रोहिणीला नेमकं काय चाललंय हे समजण्याच्याआधीच प्रशांतने तिच्या डोळ्यात चटणी टाकली.(stream) त्यानंतर त्याने कोयत्याने तिच्यावर वार केले. रोहिणीने स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक झालेला हल्ला आणि अंधारामुळे तिला कुठेही पळता आलं नाही. निर्मनुष्य ठिकाण असल्याने कोणीही तिच्या मदतीला आलं नाही. पती डोक्यावर आणि मानेवर वार करत असतानाच स्वत:ला वाचवण्यासाठी रोहिणीने हातावर कोयत्याचे वार झेलले. प्रशांतने अगदी त्वेषाने पत्नीवर एकामागून एक वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचं निश्चित केल्यानंतर प्रशांत तिच्या मृतदेहावर कोयता टाकून घटनास्थळावरुन पळून गेला.

घरी पोहचल्यानंतर प्रशांतने मी रोहिणीची हत्या केल्याचं कुटुंबियांना सांगितलं आणि काही मिनिटांमध्येच घरातून पळ काढला. कुटुंबियांना त्यांनी जे ऐकलं त्यावर विश्वासच बसत नव्हता. तातडीने कुटुंबियांनी प्रशांत सांगितलेल्या जागी म्हणजेच घटनास्थली धाव घेतली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदेंच्या नेतृत्वाखाली वडगाव पोलीस स्टेशनमधील एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली.(stream) रात्रभर शोध घेऊन पोलिसांनी आरोपी प्रशांत अधिक दूर पळून जाण्याआधीच त्याचा ताब्यात घेतलं. वडगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून रोहिणीचा मृतदेह पारगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

रोहिणीची हत्या झाल्याचं समजल्यानंतर तिच्या माहेरुन म्हणजेच ढवळी गावातील शेकडो नातेवाईक आणि ग्रामस्थ भादोले गावात दाखल झाले. (stream)संशयित आरोपी म्हणजेच प्रशांतच्या दुचाकी गॅरेजसमोर संतप्त जमावाने निषेध व्यक्त केला. रागाच्या भरात प्रशांतने सुखी संसारला तिलांजली देत दोन लहान मुलींवरील आईचे छत्र हेरावून घेतल्याच्या भावना गावकरी व्यक्त करत होते.पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून नेमकं असं काय घडलं की प्रशांतने असा टोकाचा निर्णय घेतला याचा शोध घेत आहेत. कौटुंबिक वाद, रोहिणीचं वारंवार माहेरी जाणं, सामाजिक दबाव या अंगाने पोलीस तपास करत आहेत. प्रशांतने अशा क्रूर पद्धतीने पत्नीची हत्या का केली, याचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाही. त्यामुळे पोलीस आता या दोघांच्या ओळखीतील लोकांची चौकशी करत नेमकं घडलं काय हे जाणून घेतल्यानंतर प्रशांतचा जबाब नोंदवणार आहेत.

हेही वाचा :

SUV खरेदी करायचीये का? 

आजचे 1 कोटी 10 वर्षांनी किती होणार,

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म;