सातत्याने कारवाया करणाऱ्या, दहशतवादी संघटनांना भारता विरोधी(continuously) दहशतकांड करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करणाऱ्या पाकड्यांना आता त्यांच्या देशातच दहशतकांडाला सामोरे जावे लागत आहे. भारताचा फक्त काश्मीर अशांत ठेवणाऱ्या तेथील राज्यकर्त्यांना संपूर्ण पाकिस्तान अशांततेत जात असल्याचे चित्र पाहण्याचे नशिबी आले आहे. बलुचिस्तान , पख्तून आणि आता पाक व्याप्त काश्मीरमध्ये लोकांचा सरकार विरुद्ध प्रक्षोभ सुरू झाला आहे. भारताविरुद्ध आपण काश्मीरमध्ये जे पेरले ते पाकिस्तानच्या विविध प्रांतात उगवू लागले आहे या अनुभवातून सध्या तेथील राज्यकर्ते जात आहेत.

पाक व्यक्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग गेल्या 75 वर्षापासून पाकिस्तानच्या ताब्यात आहे. हा पीओके नजीकच्या काळात तेथील जनतेच्या मान्यतेनेच भारतात समाविष्ट होईल असे काही महिन्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते.पीओके मध्ये गेल्या काही महिन्यापासून लोकप्रिय झालेली एक नागरी संघटना अवामी ॲक्शन कमिटीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरली आहे. त्यांनी पाक सरकारकडे38 मागण्या केल्या आहेत. (continuously)पी ओ के च्या विधानसभेत पाकिस्तानमधील काश्मिरी निर्वासितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या बारा जागा रद्द करण्यात याव्यात अशी त्यांची एक प्रमुख मागणी आहे. त्यांच्या एकूण मागण्यांचा विचार केला तर पीओके मधील लोकांना स्वातंत्र्य हवे आहे आणि त्यासाठीच तेथील जनता आता रस्त्यावर उतरली आहे.

बलुचिस्तान मधील बी एल ए संघटनेच्या प्रमुखांनी हा प्रांत स्वतंत्र झाल्याची घोषणाच करून टाकली आहे. एकूणच पाकिस्तानच्या प्रमुख प्रदेशातून लोकांचा उठाव होत असल्याचे बघून पाकिस्तानचे राज्यकर्ते बिथरले आहेत, घाबरले आहेत.पाकिस्तानच्या काही प्रांतातील जनतेने उठाव केल्यानंतर बांगलादेश प्रमाणे भारताने तेथे लष्करी हस्तक्षेप करू नये किंवा करतील म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी सौदी (continuously)अरेबियाशी काही दिवसांपूर्वी संरक्षण विषयक करार केला आहे. सौदी अरेबिया किंवा पाकिस्तान या दोन राष्ट्रांपैकी एका राष्ट्रावर दुसऱ्या राष्ट्राने भारत हल्ला केला तर तो दोन्ही राष्ट्रावर हल्ला झाला असल्याचे समजले जाईल आणि दोघांनी एकत्र येऊन त्याचा सामना करावा असे या करारामध्ये म्हटले आहे.

या दोन देशांमधील हा करार हा सरळ सरळ भारताविरुद्ध असल्याचेम्हटले पाहिजे. आणि म्हणूनच भारत सरकारने सौदी अरेबियाला काही निर्णय घेऊन अप्रत्यक्ष समज दिली आहे, इशारा दिला आहे. आणि त्यामुळे सौदी अरेबिया सटपटला आहे. सौदी अरेबियाला, तिथल्या राजपुत्राला इस्लामिक राष्ट्राचा खलिफा अर्थात नेता बनावयाचे आहे तर पाकिस्तानला आम्ही अण्वस्त्रधारी आहोत, (continuously)आम्ही तुमचे इतर शत्रूंपासून तुमचे संरक्षण करू शकतो असा संदेश द्यावयाचा आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोघांनी बिगर इस्लामिक राष्ट्रांची जशी नाटो संघटना आहे तशी इस्लामिक राष्ट्रांची नाटो संघटना स्थापन करावी असा एक प्रस्ताव इस्लामिक राष्ट्रांसमोर ठेवला होता.

पण बहुतांशी 18 पेक्षा अधिक इस्लामिक राष्ट्रांनी अशा प्रकारचा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे हे दोन्ही देश तोंडावर आपटले आहेत.भारत किंवा अन्य देश हे आमचे व्यापारी संबंध असलेले मित्र आहेत. भारत हा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. अशा देशांना आम्ही दुखवू शकत नाही असे या राष्ट्रांनी म्हटले आहे.(continuously) सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोघांनाही इस्लामिक राष्ट्रांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करावयाचे आहे पण त्यांचे हे मनसुबे त्या देशांच्या प्रमुखांनी नाकाब ठरवले आहेत.आखाती देशातील इस्लामिक राष्ट्रांचा इजरायल हा शत्रू देश आहे. इजरायलने हमास आणि पॅलेस्टिनीना
कायमची अद्दल घडवण्यासाठी युद्ध पुकारले आहे आणि आता तर ते विस्तारले आहे.

इस्लामिक देश हे नाटक संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आले तर इजराइल बॅकफूटवर जाऊ शकतो किंवा तो आखाती देशावर हल्ला करण्याचे धाडस करणार नाही (continuously)असाही एक हेतू सौदी व पाकिस्तानचा या प्रस्तावा मागे होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामिक राष्ट्रांना एका झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाक राज्यकर्त्यांच्या खाली आता असंतोषाचे निखारे धगधगू लागले आहेत. बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या हातातून जवळजवळ निसटला आहे आणि पाकिस्तानचा आणखी एक तुकडाच पडलेला आहे. अशावेळी पीओके मधील अवामी ॲक्शन कमिटी रस्त्यावर उतरली आहे. एकूणच पाकिस्तानला आपल्या देशाचे आणखी काही तुकडे पडल्याचे पहावे लागले तर त्यात आश्चर्य असे काहीच नाही.

हेही वाचा :

‘या’ बँकांच्या FD मध्ये आगाऊ गुंतवणूक करा,

नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?

समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला