कोल्हापूर शहरात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या (opposition)नवीन कार्यालयाच्या उद्घाटनानंतर वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. AIMIMच्या या पावलाला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला असून स्थानिक स्तरावर आंदोलने व घोषणाबाजी करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, AIMIMचे शहरातील पहिले कार्यालय सुरू करण्यात आले असून या निमित्ताने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम आयोजित केला. परंतु काही स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी AIMIM हा पक्ष समाजात दुरावा निर्माण करतो, अशा आरोपांसह कार्यालय उभारणीविरोधात आक्षेप घेतला. त्यांच्या मते, कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरात AIMIMचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न हा धोकादायक आहे.

यावेळी पोलिसांनी मोठ्या संख्येने बंदोबस्त तैनात केला होता.(opposition) जमाव जमू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली तसेच AIMIMच्या कार्यालयाजवळ निषेध नोंदवणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. काही ठिकाणी जोरदार घोषणाबाजी झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले.AIMIMच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून राजकारण करत आहोत.

कोल्हापूरसह महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणे, त्यांचा आवाज बुलंद करणे हाच आमचा उद्देश आहे. कोणत्याही समुदायात दुरावा निर्माण करणे हे आमचे ध्येय नाही.”दरम्यान, विरोधक संघटनांनी AIMIMचे कार्यालय तात्काळ हटवावे अशी मागणी केली असून आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापूर पोलिसांनी मात्र शहरवासीयांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.(opposition)या घडामोडीमुळे कोल्हापूरच्या राजकीय वातावरणात चांगलाच तणाव निर्माण झाला असून AIMIMच्या आगामी राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
हेही वाचा :
तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान;
भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय!