दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने दमदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सवर एकतर्फी विजय मिळवला. आयपीएलच्या 51 व्या सामन्यात केकेआरने 143 धावांचे लक्ष्य अवघ्या 14.2 षटकांत दोन विकेट्स गमावून पूर्ण केले. या विजयासह कोलकात्याने सलग चौथा सामना जिंकत विजयी मालिकेला सुरुवात ठेवली, (one-sided victory) तर दिल्लीचा घरच्या मैदानावरील सलग पाचवा पराभव ठरला.

143 धावांच्या पाठलागात केकेआरला कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फिन एलन यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी केली. मात्र रहाणे 13 धावांवर धावबाद झाला, तर अंगकृष रघुवंशी अवघी 1 धाव करून बाद झाला. त्यामुळे केकेआरची अवस्था 3.4 षटकांत 2 बाद 31 अशी झाली होती. यानंतर फिन एलन आणि कॅमरून ग्रीन यांनी दिल्लीच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 116 धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. ग्रीनने 27 चेंडूत नाबाद 33 धावा करत चांगली साथ दिली.
या सामन्याचा खरा हिरो ठरला तो फिन एलन. एलनने अवघ्या 47 चेंडूत नाबाद 100 धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या खेळीत 10 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. त्याने चौकार-षटकारांचा वर्षाव करत दिल्लीच्या गोलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ केले. दिल्लीकडून अक्षर पटेलला एकमेव विकेट मिळाली. त्याआधी टॉस जिंकून कोलकात्याने दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. दिल्लीला 20 षटकांत 8 बाद 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाथुम निसांका याने सर्वाधिक 50 धावा केल्या, तर आशुतोष शर्मा 39 आणि केएल राहुल 23 धावांवर समाधान मानावे लागले. इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.
कोलकात्याकडून अनुकूल रॉय आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत दिल्लीला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर फलंदाजांनी केलेल्या तुफानी कामगिरीमुळे केकेआरने शानदार विजय साकारला.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?