शेतकऱ्यांना पीएम किसानचा २३वा हप्ता कधी येणार? या दिवशी जमा होऊ शकतात ₹२०००

देशभरातील शेतकऱ्यांसाठी (installment)महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पुढील म्हणजेच २३व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२००० जमा केले जातात, त्यामुळे या रकमेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (installment)एप्रिल अखेर ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा २३वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याआधीचा २२वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात वितरित करण्यात आला होता, त्यामुळे त्यानुसार पुढील हप्त्याची वेळ जवळ आली आहे.

सरकारकडून अधिकृत तारीख (installment)जाहीर झालेली नसली तरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत. ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे आणि ज्यांची जमीन व कागदपत्रे योग्य आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार आहे.म्हणूनच, शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची माहिती, आधार लिंक आणि ई-केवायसी वेळेत पूर्ण करून ठेवणे गरजेचे आहे. कोणतीही चूक असल्यास हप्ता अडकू शकतो, त्यामुळे आधीच सर्व तपशील तपासून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.