थोडी दारु पिली तर चालते, असा तुमचा समज असेल तर नवीन संशोधन हा समज दुरु करणारा ठरला आहे. कारण सुशिक्षित वर्गात ‘स्टेटस सिम्बॉल’ मानले जाणारे दारु पिणे थेट कॅन्सरसह ६२ आजारांना आमंत्रण देत असल्याचा धक्कादायक खुलासा एका नवीन संशोधनातून करण्यात आला आहे.(drinking) दारुचा शौक केवळ यकृतालाच नाही, तर थेट कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांनाही निमंत्रण देत असल्याचे नवीन संशोधनात स्पष्ट झाले आहे.

५० हून अधिक आजार हे केवळ दारु पिण्यामुळेच होतात ‘ॲडिक्शन’या प्रसिद्ध वैद्यकीय जर्नलमध्ये १३ मे रोजी ‘मद्यपानाचे प्रमाण आणि आजारांचा धोका’ या विषयावर एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, दारूचा (मद्यपानाचा) थेट संबंध तब्बल ६२ आजारांशी जोडला गेला आहे. या संशोधनात अशा ५० हून अधिक आजारांची यादीच समोर आली आहे, जे केवळ आणि केवळ दारू पिण्यामुळेच होतात. (drinking) यात वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर, पोटाचे विकार, टीबीसारखे संसर्गजन्य आजार आणि हृदयाच्या गंभीर आजारांचा समावेश आहे. या अभ्यासानुसार, दारूमुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स बिघडतात, अन्नाचे पचन नीट होत नाही, शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत आणि मानसिक आरोग्य बिघडून माणसाचे वागणे-बोलणेही बदलू लागते, असेही अभ्यासात नमूद केले आहे.
दारू पिण्यामुळे केवळ शरीराची आजारांशी लढण्याची ताकद (प्रतिकारशक्ती) कमी होत नाही, तर कॅन्सरसारखे आणि इतर कधीही न बरे होणारे मोठे आजार होण्याचा धोका प्रचंड वाढतो. अमेरिकेतील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अँड्र्यू फ्रीमन यांनी ‘सीएनएन’शी बोलताना सांगितले की, “आपण हातावरील किंवा जखमेवरील जंतू मारण्यासाठी सॅनिटायझर किंवा जंतुनाशक वापरतो, (drinking) त्यात ‘अल्कोहोल’ (दारूचा अंश) असतो. विचार करा, अल्कोहोल जंतूंना मारण्यासाठी वापरले जाते, ते मुळातच एक प्रकारचे विष आहे. अल्कोहोल जंतू मारू शकते, तर ते आपल्या शरीरासाठी कसे चांगले असेल? म्हणूनच, दारू कितीही कमी प्रमाणात प्यायली तरी ती सुरक्षित आहे का, हाच खरा मोठा प्रश्न आहे.”
‘ॲडिक्शन’ जर्नलमध्ये प्रकाशित शोधनिबंधाच्या लेखकांपैकी एक डॉ. ज्युर्गेन रेहम यांनी स्पष्ट केले की, ६२ प्रकारचे आजार होण्यासाठी दारु पिणे हे एक प्रमुख कारण आहे. दारु नसती तर हे आजार जगात अस्तित्वातच नसते. असे आणखी ३० आजार आहेत ज्यात अल्कोहोलची भूमिका असते, स्तनाचा आणि इतर कर्करोग, हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह आणि स्मृतिभ्रंश, यासाठी दारु पिणे हेच कारण ठरते. ज्युर्गेन रेहम यांनी ‘अल्कोहोलचा वापर आणि मद्यपीपणाशी संबंधित धोके’ (२०११) नावाच्या अभ्यासाचा हवाला देत ‘हेवी ड्रिंकिंग’ची व्याख्या स्पष्ट केली आहे. महिलांसाठी: दिवसाला ४० ग्रॅमपेक्षा जास्त शुद्ध अल्कोहोल (साधारण ४१ मिली किंवा १.४ औंस दारू) पिणे म्हणजे अति मद्यपान आहे. तर पुरुषांसाठी हेच प्रमाण दिवसाला ६० ग्रॅमपेक्षा जास्त शुद्ध अल्कोहोल (साधारण ६२ मिली या २.१ औंस दारू) पिणे म्हणजे अति मद्यपान आहे.
ज्युर्गेन रेहम यांनी स्पष्ट केले की, “दारूमुळे शरीराचे होणारे नुकसान आपण वेळीच रोखू शकतो आणि ते पूर्ववत देखील करू शकतो. रोगप्रतिकारक शक्तीवर होणारे मद्यपानाचे तात्काळ परिणाम फार काळ टिकत नाहीत. तुम्ही दारू पिणे किती प्रमाणात सोडता यावर ते अवलंबून आहे. दारू पूर्णपणे बंद केल्यास अवघ्या काही दिवसांत ते एका आठवड्यात आपले शरीर पुन्हा पूर्वपदावर येऊ लागते.”
हेही वाचा
जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू
भिलवडीत पाच हजाराची लाच घेताना हवालदार जाळ्यात
ग्राहकांना अजून मोठा झटका गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?