कोल्हापूर ४० पार, हवामान विभागाचा अंदाज आला, उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’

कोल्हापूरमध्ये उष्णतेचा पारा (Meteorological)दिवसेंदिवस चढत असून तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रखर उन्हामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान (Meteorological)विभाग यांनी पुढील काही दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या लोकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणी अधिक प्रमाणात पिणे,(Meteorological) हलके कपडे परिधान करणे आणि थेट उन्हात जाणे टाळणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले आहे.कोल्हापूरसह राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने आगामी काही दिवस आव्हानात्मक ठरणार आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगून आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.