1 लिटर पाणी गाळण्यासाठी RO तून किती लिटर पाणी वाया जातं? जाणून व्हाल अवाक्

घराघरात वापरल्या (water)जाणाऱ्या RO वॉटर प्युरिफायरबाबत एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे. शुद्ध पाणी मिळवण्यासाठी आपण RO मशीनचा वापर करतो, पण त्यामागे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. तज्ज्ञांच्या मते, 1 लिटर शुद्ध पाणी मिळवण्यासाठी RO प्रक्रियेत तब्बल 2 ते 4 लिटर पाणी वाया जातं.

काही जुन्या किंवा कमी(water) कार्यक्षम मशीनमध्ये ही नासाडी आणखी जास्त असू शकते.ही प्रक्रिया ‘रिव्हर्स ऑस्मोसिस’ तंत्रज्ञानावर आधारित असून, त्यामध्ये अशुद्ध पाणी फिल्टर करताना मोठा भाग ‘वेस्ट वॉटर’ म्हणून बाहेर टाकला जातो. त्यामुळे एकीकडे आपण सुरक्षित पाणी पित असलो तरी दुसरीकडे नकळत पाण्याचा अपव्यय वाढवत आहोत.पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असताना ही बाब चिंताजनक मानली जात आहे.

विशेषतः शहरांमध्ये मोठ्या (water)प्रमाणात RO वापरामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा अंदाज आहे. यावर उपाय म्हणून तज्ज्ञ RO मधून निघणारं वेस्ट पाणी झाडांना पाणी देण्यासाठी, साफसफाईसाठी किंवा इतर घरगुती कामांसाठी वापरण्याचा सल्ला देत आहेत.त्याचबरोबर, नवीन तंत्रज्ञान असलेले ‘लो-वेस्ट’ RO सिस्टम किंवा UV/UF सारखे पर्यायही वापरण्याचा विचार करावा, असेही सांगितले जात आहे. पाणी वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याने RO वापरताना सजग राहणे आता काळाची गरज बनली आहे.