सतत पोटात गॅस होणे, पोट फुगणे, (suffering)ढेकर येणे किंवा जळजळ होणे ही समस्या आजकाल अनेकांना त्रासदायक ठरत आहे. बदललेली जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि ताणतणाव यामुळे ही समस्या वाढताना दिसत आहे.

मात्र काही सोपे घरगुती, (suffering) उपाय करून या त्रासातून त्वरित आराम मिळू शकतो.सकाळी कोमट पाण्यात थोडे लिंबू आणि मध मिसळून पिल्यास पचनक्रिया सुधारते आणि गॅस कमी होतो. तसेच जेवणानंतर थोडी बडीशेप किंवा जिरे खाल्ल्यास पोट हलके राहते. आले आणि हिंग यांचा वापर देखील गॅस कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
कोमट पाण्यात हिंग टाकून , (suffering)पिल्यास पोटातील फुगवटा कमी होतो.तसेच दिवसातून पुरेसे पाणी पिणे, तेलकट आणि जंक फूड टाळणे, वेळेवर जेवण करणे आणि हलका व्यायाम करणे यामुळेही गॅसची समस्या नियंत्रणात राहते. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास पचन सुधारते.हे सोपे उपाय नियमितपणे केल्यास गॅसचा त्रास कमी होऊन शरीर हलके आणि निरोगी राहण्यास मदत होते.