UPI वरून चुकीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले? ही प्रोसेस फॉलो करा अन् लगेच मिळवा पैसे

UPI व्यवहार करताना (account)छोटीशी चूकही महागात पडू शकते आणि चुकीच्या खात्यावर पैसे गेल्यानंतर अनेकजण घाबरून जातात, मात्र अशा परिस्थितीत घाईगडबड न करता योग्य प्रक्रिया फॉलो केली तर तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. सर्वप्रथम व्यवहार झाल्यानंतर लगेच आपल्या बँकेच्या कस्टमर केअरला संपर्क साधणे गरजेचे असते आणि त्या ट्रान्झॅक्शनची सर्व माहिती त्यांना द्यावी लागते, जसे की ट्रान्झॅक्शन आयडी, तारीख आणि रक्कम.

त्यानंतर संबंधित UPI ॲपमध्ये (account) जाऊन “Raise a Complaint” किंवा “Report Issue” हा पर्याय निवडून तक्रार नोंदवावी, यामुळे तुमची विनंती अधिकृतरीत्या नोंदली जाते.याशिवाय National Payments Corporation of India (NPCI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही तक्रार करता येते, जिथे “UPI Complaint” सेक्शनमध्ये आवश्यक तपशील भरून सबमिट करावे लागतात.

जर समोरच्या व्यक्तीने पैसे परत (account)करण्यास नकार दिला, तर तुमच्या बँकेकडून त्या खात्याशी संपर्क साधला जातो आणि गरज पडल्यास पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.महत्त्वाचे म्हणजे, शक्य तितक्या लवकर तक्रार करणे अत्यंत गरजेचे असते कारण वेळ गेल्यास पैसे परत मिळवणे कठीण होऊ शकते. तसेच, भविष्यात अशी चूक टाळण्यासाठी पैसे पाठवण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचे नाव, UPI आयडी आणि रक्कम नीट तपासूनच व्यवहार करावा, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.