तन्वी कोलते नाही तर ‘हा’ सदस्य मारणार बाजी, उचलणार ‘बिग बॉस मराठी ६’ ची ट्रॉफी?

‘Bigg Boss Marathi 6’ सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. घरातील सदस्यांमधील वाद, मैत्री, प्रेमसंबंध आणि होस्ट Riteish Deshmukh यांच्या ‘भाऊचा धक्का’मुळे या सीझनने विशेष रंगत आणली. प्रेक्षकांनीही या शोला भरभरून प्रतिसाद दिला असून आता हा सीझन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

ग्रँड फिनाले काही दिवसांवर असताना घरात मोठा ट्विस्ट पाहायला (discussion) मिळाला. वाइल्ड कार्डद्वारे एन्ट्री घेतलेल्या Reva Kaurase हिला घराचा निरोप घ्यावा लागला. तिच्या जाण्याने घरातील वातावरण भावनिक झाले, विशेषतः Tanvi Kolte हिला याचा मोठा धक्का बसला. प्रभूनंतर रेवासोबत तिची चांगली मैत्री निर्माण झाली होती, त्यामुळे तिच्या एलिमिनेशननंतर तन्वीने व्यक्त केलेल्या भावना सोशल मीडियावर चर्चेत आल्या.

या घटनेदरम्यान तन्वीने केलेल्या वक्तव्यावरून घरात वाद रंगला. त्यावर Anushree Mane हिने दिलेल्या उत्तराने परिस्थिती आणखी तापली. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जोरदार उमटत आहेत. विशेष म्हणजे, सुरुवातीपासून तन्वीला पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांमध्ये आता नाराजी दिसून येत आहे, तर अनुश्रीला वाढता पाठिंबा मिळताना दिसतोय.

दरम्यान, विजेतेपदाच्या शर्यतीत नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत. Rakesh Bapat आणि अनुश्री माने यांना प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा मिळत असून त्यांची नावे विजेतेपदासाठी पुढे येत आहेत. टॉप-५ फायनलिस्टमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, Vishal Kotian आणि Dipali Sayyed यांचा समावेश आहे.

‘Bigg Boss Marathi 6’चा ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 रोजी होणार असून तो रात्री 8 वाजता ‘कलर्स मराठी’ आणि ‘जिओहॉटस्टार’वर प्रेक्षकांना पाहता येईल. मतदानाच्या लाईन्स 18 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत खुल्या राहणार आहेत. अखेर या सीझनची ट्रॉफी कोणाच्या नावावर जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार

इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक