दानोळीत भरतेशच्या निधनानंतर गावात सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून बौद्ध समाजाने मोठा निर्णय घेतला आहे.

(युवराज पाटील) कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात एका व्यापाऱ्याच्या खुनाची घटना घडली. सोमवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने दानोळी गावासह शिरोळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. गावातील शांत, कष्टाळू व्यवसायिक भरतेश्वर टोपगोंडा यांचे अपहरण करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याने संपूर्ण गाव हादरून गेले. ही घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नसून, गावाच्या माणुसकीलाच लागलेला मोठा घाव ठरली आहे.
दरम्यान, याच दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. (Danoli) दरवर्षी मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि मिरवणुकीच्या स्वरूपात साजरी होणारी जयंती यंदा या घटनेने रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर समस्त बौद्ध समाजाने एक अत्यंत संवेदनशील आणि सामाजिक भान राखणारा निर्णय घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघणारी पारंपरिक मिरवणूक रद्द करण्यात आली. हा निर्णय केवळ शोक व्यक्त करण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण गावाशी एकात्मता दर्शवण्यासाठी आणि “दुःखातही आपण एक आहोत” हा ठाम संदेश देण्यासाठी घेतला गेला.या कृतीतून सामाजिक एकतेचा, परस्पर सहानुभूतीचा आणि माणुसकीचा अत्यंत प्रभावी संदेश समाजासमोर आला. दुःखाच्या या काळात दानोळीकरांनी दाखवलेली ही एकजूट आणि संवेदनशीलता, हीच खरी समाजाची ताकद असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.
दानोळी येथील घाऊक भाजीपाला व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय ४२) या तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपहरणकर्त्यांनी २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या प्रकारामुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली. (Danoli) या प्रकरणी पोलिसांनी राजदीप ताडे, मंथन चंदुरे (रा. दानोळी, ता. शिरोळ) यांना अटक केली आहे. पोलिसांच्या दिरंगाईमुळे जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित राजदीप ताडे, मंथन चंदुरे यांना ताब्यात घेतले आहे. ते दोघेही गावातील एका नागरिकाचे भाचे आहेत. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं तर जीव वाचला असता
रात्री अकरा वाजता नातेवाईक पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी गेले होते. खंडणीच्या फोनचे रेकॉर्डिंग ऐकविल्यानंतरही पोलिसांनी केवळ बेपत्ता झाल्याची नोंद घेऊन, ‘उद्या बघू’, असे सांगून तक्रारदारांना परत पाठविले. (Danoli) त्याचवेळी पोलिसांनी तपास आणि हालचाल केली असती; तर कदाचित भरतेश यांचा जीव वाचला असता, असा सूर नागरिकांमध्ये होता. आज सकाळीही शोध घेत असताना काहींनी पोलिसांना लवकर तपास करण्याची विनंती केली असता पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हेही वाचा
लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार
इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय