आयपीएल २०२६ मध्ये कठीण प्रसंगाचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्स (Injury) संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. संघाचा मुख्य सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे पुढील काही सामन्यांतून बाहेर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्धच्या लढतीदरम्यान रोहितला शारीरिक व्याधीमुळे मैदान सोडावे लागले होते, ज्याचा मोठा परिणाम संघाच्या कामगिरीवर आणि निकालावर झाल्याचे दिसून येत आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगच्या समस्येचा त्रास जाणवू लागला. वेदना अधिक असल्याने त्याला वैद्यकीय पथकाची मदत घ्यावी लागली आणि अखेरीस तो दुखापतीमुळे निवृत्त होत पॅव्हेलियनमध्ये परतला. या अनपेक्षित धक्क्यातून सावरणे मुंबईला शक्य झाले नाही आणि हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखालील संघाला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

या पराभवानंतर मुंबईचा संघ आता १६ एप्रिल रोजी पंजाब किंग्स (Injury) आणि २० एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मैदानात उतरेल. मात्र, या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये रोहित संघात असेल की नाही, याबाबत साशंकता आहे. रोहितची अनुपस्थिती मुंबईच्या फलंदाजीची धार कमी करू शकते, ज्यामुळे संघ व्यवस्थापनाचा ताण वाढला आहे.
रोहित शर्माने या हंगामात आतापर्यंत वैयक्तिक स्तरावर चांगली कामगिरी केली (Injury) असून चार सामन्यांमध्ये त्याने १३७ धावा केल्या आहेत. प्रभावी गतीने खेळणाऱ्या रोहितने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ३८ चेंडूत ७८ धावांची धुवांधार खेळी केली होती. त्या सामन्यात मुंबईने ६ गडी राखून विजय मिळवला होता, परंतु त्यानंतर संघाला विजयाची लय राखता आलेली नाही.गेल्या तीन सामन्यांमध्ये मुंबईला दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि बंगळूरकडून सलग पराभवाचे चटके बसले आहेत. सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंना आता रोहितच्या अनुपस्थितीत अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट आणि शार्दुल ठाकूर या गोलंदाजांच्या कामगिरीवरही आता संघाचे भवितव्य अवलंबून असेल.
हेही वाचा
लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार
इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय