अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर (shocked)बाजारात आंब्याची जोरदार मागणी वाढली असली तरी यंदा सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा ‘फळांचा राजा’ अक्षरशः परवडणारा राहिलेला नाही. राज्यभरात विविध ठिकाणी आंब्यांच्या किंमतींनी विक्रमी उच्चांक गाठला असून, दर ऐकूनच ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळत आहे.

हापूस, केसर आणि इतर (shocked)दर्जेदार आंब्यांच्या आवक कमी असल्यामुळे दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. हवामानातील बदल, अवेळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादन घटल्याने बाजारात पुरवठा मर्यादित झाला आहे. त्याचा थेट परिणाम किंमतींवर दिसून येत आहे. काही ठिकाणी दर्जेदार हापूस आंबा हजारो रुपयांच्या घरात पोहोचला आहे.दरम्यान, सणाच्या निमित्ताने आंब्याची मागणी नेहमीप्रमाणे वाढलेली असते.
मात्र यंदाच्या वाढलेल्या दरामुळे (shocked)ग्राहक खरेदी करताना दोनदा विचार करत आहेत. अनेक कुटुंबांनी यंदा आंब्याचा आस्वाद घेण्यावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र दिसत आहे.व्यापाऱ्यांच्या मते, पुढील काही आठवड्यांत आवक वाढल्यास दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र सध्यातरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.