रत्नागिरीची तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी 6’ची महाविजेती

बिग बॉस मराठी चा सहावा सिझन तब्बल तीन महिन्यांच्या प्रवासानंतर अखेर भव्य समारोपासह पूर्ण झाला. कलर्स मराठीवर सुरू झालेल्या या पर्वाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. (grand finale) राज्यभरातील घराघरांत पोहोचलेल्या या शोमध्ये 17 स्पर्धकांनी 100 दिवस कॅमेरांच्या नजरकैदेत राहून आपापला खेळ सादर केला. या कालावधीत प्रेक्षकांनी त्यांच्या आयुष्यातील भांडणं, मैत्री, भावनिक क्षण आणि नात्यांमधील बदल जवळून अनुभवले.

19 एप्रिल 2026 रोजी मुंबईत पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्यात अखेर विजेतीची घोषणा झाली आणि या रोमांचक प्रवासाचा शेवट झाला. सुरुवातीपासून सातत्यपूर्ण आणि दमदार खेळ करत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या तन्वी कोलते हिने यंदाच्या सिझनचं विजेतेपद पटकावलं. अंतिम क्षणापर्यंत ताणतणाव कायम असताना विजेतेपद जाहीर होताच वातावरणात जल्लोष पसरला.

विजेतीला 15 लाख रुपयांची बक्षीस रक्कम आणि ट्रॉफी देण्यात आली. याशिवाय पु. ना. गाडगीळ अँड सन्सकडून 10 लाख रुपयांचं ज्वेलरी वाऊचर, रेवा डायमंडची नैसर्गिक हिऱ्यांची दागिन्यांची खरेदीची संधी आणि तुनवाल ई मोटर्सची लिथीनो प्रो ही इलेक्ट्रिक बाईक देण्यात आली. विशेष म्हणजे, अभिनेते रितेश देशमुख आणि ‘राज शिवाजी’ चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर फोटोही विजेतीला भेट देण्यात आला.

विजयानंतर भावना व्यक्त करताना तन्वी कोलतेने हा प्रवास आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि शिकवणारा ठरल्याचं सांगितलं. या घराने तिला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला शिकवलं आणि प्रत्येक परिस्थितीत ठाम राहण्याची ताकद दिली, असं ती म्हणाली. प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम आणि पाठिंबा हाच तिच्या यशामागचा खरा आधार असल्याचं तिने नमूद केलं. सुरुवातीला स्वतःबद्दल शंका उपस्थित केल्या जात असताना, बाहेर पडताना लोकांच्या तोंडी स्वतःचं नाव असावं हा तिचा निर्धार होता आणि आज तो पूर्ण झाल्याचं ती अभिमानाने सांगते.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?