होर्मुज खाडी परिसरात वाढलेल्या तणावामुळे जगभरात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र होत असल्याने जागतिक (conflict) अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या काही तासांमध्ये परिस्थिती झपाट्याने बदलत असून शांतता चर्चेपूर्वीच तणाव शिगेला पोहोचल्याचं चित्र आहे.

या घडामोडींचा थेट परिणाम जागतिक तेलबाजारावर झाला आहे. ब्रेंट क्रूड आणि डब्ल्यूटीआय क्रूड यांच्या किमतींमध्ये मोठी उसळी दिसून आली. व्यापार पुन्हा सुरू होताच कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आणि प्रति बॅरल किंमत झपाट्याने वाढली. या वाढीमुळे अनेक देशांमध्ये महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तणाव वाढण्यामागे समुद्री मार्गावरील हालचाली महत्त्वाच्या ठरत आहेत. होर्मुज खाडी ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. येथे वाहतूक ठप्प झाल्याने जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. दरम्यान, इराणकडून अमेरिकन जहाजांवर ड्रोन हल्ल्याचे वृत्त समोर आल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली आहे. प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने इराणी जहाज ताब्यात घेतल्याने दोन्ही देशांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
तणाव कमी करण्यासाठी काही वेळासाठी इराणने खाडी खुली करण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे तेलाच्या किमतीत थोडी घसरण झाली. मात्र अमेरिकेने नाकेबंदी हटवण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा परिस्थिती बिघडली आणि खाडी परिसरात अनिश्चितता वाढली. परिणामी, जागतिक ऊर्जा बाजार पुन्हा अस्थिर झाला आहे.
या सर्व घडामोडींमुळे जगभरात चिंता वाढली असून ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जर हा संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला, तर तेलटंचाईसह आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार