नीट २०२६ फेरपरीक्षेचा निकाल २० जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता?

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या NEET UG 2026 परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून नीट यूजी 2026 चा निकाल 20 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निकालापूर्वीच एनटीएने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी करत बँक खात्याचे तपशील (results) अद्ययावत करण्यासाठी 7 जुलै रोजी रात्री 11:50 वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.

यंदा मे महिन्यात झालेल्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर 21 जून रोजी नीट यूजीची फेरपरीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला 20 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. (results) त्यानंतर 25 जून रोजी तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आणि 28 जूनपर्यंत विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागवण्यात आले. आता अंतिम उत्तरतालिका आणि निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली आहे.वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, एनटीए विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी शक्य तितक्या लवकर निकाल जाहीर करण्याच्या तयारीत आहे. निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावरून आपला स्कोअरकार्ड डाउनलोड करता येणार आहे.दरम्यान, एनटीएने परीक्षा शुल्काच्या रिफंडसंदर्भातही महत्त्वाची सूचना जारी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पोर्टलवर बँक खात्याची माहिती अचूक भरलेली नाही, त्यांनी ती 7 जुलै रात्री 11:50 वाजेपर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे. अन्यथा रिफंडची रक्कम मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनीच बँक खात्याचे तपशील योग्यरित्या अपडेट केले आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण करू शकलेले नाहीत. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या लॉग-इनद्वारे बँक खात्याची माहिती तपासून आवश्यक असल्यास दुरुस्ती करावी, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.ज्या विद्यार्थ्यांनी आधीच योग्य बँक तपशील सादर केले आहेत, (results) त्यांच्या खात्यात रिफंडची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंतिम मुदतीपूर्वी माहिती अद्ययावत करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पुढील टप्प्यात रिफंड मिळणार असल्याने कोणतीही दिरंगाई न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?

पीएफ खातेधारकांसाठी नवीन नियम, पेन्शनबाबतही मोठे बदल?

धाड धाड कोसळले तेलाचे भाव, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट?