डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट अटकेनंतर नगरसेवक रमेश म्हात्रे थेट रुग्णालयात?

पोलिसांनीदेखील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र अटकेची माहिती समोर आल्यानंतर काही वेळातच रमेश म्हात्रे यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनीच ही मारहाणा केली. रुग्णालयात जाऊन त्यांनी (doctor-nurse) तसेच त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी दम देऊन डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या सर्व घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. काहीही झालं तरी रमेश म्हात्रे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीनंतर रमेश म्हात्रे यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली. या अटकेनंतर आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. रमेश म्हात्रे यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमके काय घडले आहे मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटकेनंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. संबंधित डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल आणि परवानगी मिळाल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (doctor-nurse) याच प्रकरणात आज आमदार रोहित पवार आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात भेट देत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती.

अटकेची माहिती समोर येताच आता रुग्णालयात दाखल या मागणी दरम्यानच पोलिसांनीदेखील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र अटकेची माहिती समोर आल्यानंतर काही वेळातच रमेश म्हात्रे यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. रमेश म्हात्रे यांना नेमके काय झाले आहे? अटकेला टाळण्यासाठी तर हे सर्वकाही केले जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे या मारहाणीच्या राजकीय पडसाद उमटल्यानंतर रमेश म्हात्रे यांनी घडलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलेवर हात उचलायचा नाही, (doctor-nurse) अशी शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे. आमचे म्हणणे ऐकून घ्या, हातातील फोन बाजूला ठेवा, एवढेच माझे मत होते, असा दावा रमेश म्हात्रे यांनी केला.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?