भारतामध्ये डिजिटल क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या बद्दल एक रंजक गोष्ट समोर आली आहे. देशातील कोट्यवधी ग्राहक दररोज जिओ सिम, डेटा सेवा आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करतात, मात्र ‘JIO’ या नावाचा खरा फुलफॉर्म काय आहे, हा प्रश्न आजही अनेकांना पडतो.

जिओ हे नाव सर्वत्र प्रसिद्ध असले तरी त्याचा अधिकृत फुलफॉर्म कंपनीने कधीच जाहीर केलेला नाही. प्रत्यक्षात समूहाची ही दूरसंचार क्षेत्रातील सहाय्यक कंपनी असून, २०१० मध्ये तिची स्थापना करण्यात आली आणि २०१६ मध्ये व्यावसायिक सेवा सुरू करण्यात आल्या. अधिकृत कागदपत्रे आणि संकेतस्थळांवर (JIO) हा शब्द केवळ ब्रँड नाव म्हणूनच वापरला जातो.
इंटरनेटवर मात्र जिओचा फुलफॉर्म विविध प्रकारे सांगितला जातो. काहीजण ‘Joint Implementation Opportunity’ असा अर्थ सांगतात, तर काहीजण वेगवेगळे पर्याय मांडतात. परंतु यापैकी कोणताही अर्थ कंपनीने अधिकृतरित्या मान्य केलेला नाही. काहींच्या मते (JIO) हा शब्द ‘जीओ’ म्हणजेच ‘जगणे’ किंवा ‘जीवन’ या अर्थाच्या इंग्रजी शब्दाशी साधर्म्य राखतो, आणि त्यातूनच या नावाला प्रेरणा मिळाली असावी. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली जिओने २०१६ नंतर भारतात इंटरनेट वापराचा चेहरामोहरा बदलला. स्वस्त डेटा प्लॅन, मोफत कॉलिंग आणि डिजिटल सेवांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक ऑनलाइन आले. याआधी महाग असलेला डेटा जिओमुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला.
आज जिओ ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली असून, तिचे ५० कोटींहून अधिक ग्राहक आहेत. जिओ केवळ सिम सेवा पुरवणारी कंपनी नसून, Jio Platforms मार्फत डिजिटल इकोसिस्टम उभारण्यात आली आहे. यामध्ये JioFiber, JioCinema, JioHealth यांसारख्या सेवांचा समावेश आहे. तसेच Meta आणि Google यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे.एकूणच, (JIO) हे नाव आज प्रत्येक भारतीयाच्या ओळखीचे झाले असले तरी त्याचा अधिकृत फुलफॉर्म अद्यापही गूढच राहिला आहे.
हेही वाचा
आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार