मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वच महिलांसाठी महत्वाची ठरली. यामध्ये महिन्याला १५०० रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जात होते. मात्र काही महिलांना याचा लाभ घेता येत नव्हता. तर अपात्र महिलांना तो लाभ मिळत होता. सरकारने याचं ईकेवायसी प्रक्रियेच्या मदतीने संशोधन केलं. तर जे अपात्र ठरले त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल असं सांगितलं. (women) पण काही लाडक्या बहिणींनी ईकेवायसी केली नव्हती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महत्वाची माहिती सांगितली आहे.

लाडक्या बहीणीचा लाभ हा महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच महिलांनी घेतला. ई केवायसी केल्यानंतर ८० लाख महिलांना वगळण्यात आलं. यामध्ये जवळपास २८ लाख महिलांची ईकेवायसी चुकली असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वाची दिली आहे ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली नाही किंवा ज्या महिला अपात्र आहे त्यांचा हप्ता थांबवण्यात आला आहे. तसेच पात्र असूनही केवायसी राहीली असेल तर सरकार पुन्हा एकदा केवायसीची सुविधा उपलब्ध करून द्यायला तयार आहे, (women) अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, “पात्र महिलांचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही. ज्या महिलांची केवायसी राहिली आहे, त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा विंडो सुरू करण्यासाठी तयार आहोत,” असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.सध्या लाडक्या बहिणीचं मे महिन्याचा हप्ता कधी येईल? याकडे लक्ष लागलं आहे. पण अजुनही याबद्दल कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. तर मार्च- अप्रिल महिन्याचा हप्ता हा १५ मे रोजी खात्यात जमा झाला होता. (women) त्यामुळे मे महिन्याचाही हप्ता याच दरम्यान येईल अशी शक्यता आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्ह्यात ७२ हजार जणांचे मोफत रेशन बंद
भारत-व्हेनेझुएला ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन भागीदार
पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज काय आहे अपडेट?