नृसिंहवाडीत दुसरा दक्षिणद्वार सोहळा उत्साहात पवित्र स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी?

कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या जलप्रवाहामुळे नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिर परिसरात पुन्हा एकदा पुराचे पाणी दाखल झाले असून, शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास श्री दत्त मंदिरातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा धार्मिक वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी तसेच पवित्र स्नानाचा लाभ घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

संततधार पावसामुळे कृष्णामाई दुथडी भरून वाहत असून, गुरुवारी रात्रीपासूनच नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत होती. अखेर पुराचे पाणी श्री दत्त मंदिराच्या उत्तर द्वारातून मंदिरात प्रवेशले आणि पहाटेच्या सुमारास दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. (Panchganga) यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पुजारी मंडळींनी पारंपरिक विधीनुसार पूजा-अर्चा केली, तर हजारो भाविकांनी श्रद्धेने पवित्र स्नान करून श्री दत्तांचे दर्शन घेतले. यापूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशीही मंदिरात पुराचे पाणी शिरले होते.

त्यानंतर ७ जुलै रोजी पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडला होता. त्यावेळी काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने नदीची पाणीपातळी स्थिरावली होती. (Panchganga) मात्र त्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने नदीच्या पाण्यात वाढ झाली आणि श्रींच्या पादुका जलमय झाल्या. त्या वेळी दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा कायम राहिली होती. अखेर गेल्या दोन-तीन दिवसांतील पावसाच्या वाढलेल्या जोरामुळे दुसऱ्या दक्षिणद्वार सोहळ्याचा योग जुळून आला.

नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळ्याला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. पुराच्या पाण्यामुळे मंदिर परिसर जलमय होत असला तरी हा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. त्यामुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Panchganga) दरम्यान, वाढत्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर परिसरात बॅरिकेड्स उभारले असून, भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेता यावे यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नदीकाठी अनावश्यक गर्दी न करण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा :

कर्मचाऱ्याचा ऑनड्युटी खून?

2 मिनिटांत सोलून होईल लसूण, फक्त सोप्या ट्रिक्सचा करा अवलंब?

अनिल परब यांना मोठा दिलासा, मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता?