पुण्याच्या मावळमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. भररस्त्यात भाजप कार्यकर्त्यावर गोळ्या झाडून जागीच संपवण्यात आले. ही घटना मावळच्या देवरोडवर घडली. (shot dead) गोळीबारात गंभीर जखमी झालेले भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. सध्या मावळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळच्या देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांना रमेश रेड्डी यांच्यावर ९ गोळ्या झाडल्या. त्यांच्या डोक्यात गोळी घुसल्यामुळे ते जागीच कोसळले. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ देहूरोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
या घटनेमुळे देहूरोड परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. तर रमेश रेड्डी यांचे नातेवाईक आणि मित्र परिवाराने रुग्णालयाबाहेर आक्रोश करत जुना पुणे- मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला. पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रमेश रेड्डी यांचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आला. त्यांच्या हत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
दरम्यान, रमेश रेड्डीवर यांची हत्या करण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. देहूरोड पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली. या घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत.
हेही वाचा
अरविंद केजरीवाल यांचा …….न्यायासाठी सत्याग्रह ?.
पोलादी सुरक्षा व्यवस्था …..जेव्हा भेदली जाते…
‘राजा शिवाजी’मधील लहान मुलाच्या त्या सीनवर कात्री सेन्सॉर बोर्डाने सुचवले हे मोठे बदल