काय दिवस आले? जोफ्रा आर्चरकडून शिक, जसप्रीत बुमराहला भारताच्या मोठ्या खेळाडूचा सल्ला

मुंबई इंडियन्स ही स्टार खेळाडूंची टीम आहे. यात एक खेळाडूचं अपयश अनेकांना सलतय. तो म्हणजे जसप्रीत बुमराह. आतापर्यंतच्या करियरमध्ये बुमराहने इतक्या खराब फॉर्मचा कधी सामना केला नसेल. सध्या अनेक जण त्याला सल्ले देत आहेत. जसप्रीत बुमराहचं आऊट ऑफ फॉर्म असणं हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.

टीम इंडियाचा हुकूमी एक्का म्हणजे जसप्रीत बुमराह. या खेळाडूच्या यशाबद्दल नेहमी चर्चा होते. पण सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2026 च्या सीजनमध्ये जसप्रीत बुमराहचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला आहे. बुमराह हा डिबेटचा टॉपिक बनला आहे. मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. (Jasprit Bumrah) याचं मुख्य कारण जसप्रीत बुमराहचा फॉर्म आहे. या गोलंदाजाला आपल्या लौकिकाला साजेशी बॉलिंग करता येत नाहीय. त्याला यंदाच्या सीजनमध्ये विकेटसाठी झगडावं लागत आहे. यंदाच्या सीजनमध्ये आठ सामन्यात त्याने फक्त दोन विकेट्स काढले आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांत यांनी बुमराहच्या फॉर्म बद्दल चिंता व्यक्त केली आहे. पावरप्ले मध्ये बुमराहच्या गोलंदाजीच्या रणनितीबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली आहे. नव्या चेंडूने तो खूप स्लोवर वन टाकत असल्याकडे श्रीकांत यांनी लक्ष वेधलं.

जोफ्रा आर्चरसारखी आक्रमकता दाखवं अशी श्रीकांत यांनी बुमराहला विनंती केली आहे. “तुमच्या हातात नवीन बॉल आहे. समोर दोन लेफ्टी बॅट्समन आहेत आणि बुमराह इतके स्लोवर वन टाकतो. नव्या चेंडूने इतके स्लोअर वन टाकण्याचा काही उपयोग नाही. मागच्या काही सामन्यात आर्चर काय करण्याचा प्रयत्न करतोय ते बघा. तो पूर्ण वेगात चेंडू टाकतोय. (Jasprit Bumrah) त्यामुळे फलंदाज यष्टीपाठी किंवा स्लीपमध्ये कॅच आऊट होतायत. बुमराहने सुद्धा असचं करण्याचा प्रयत्न करावा” असं श्रीकांत युट्यूब चॅनलवर म्हणाले.

राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा जोफ्रा आर्चर या सीजनमध्ये फॉर्ममध्ये आहे. नऊ सामन्यात त्याने 14 विकेट्स काढलेत. “बुमराह 100 टक्के त्याच्या बाजूने प्रयत्न करत असावा पण ते मैदानावर प्रतिबिंबित होत नाहीय. कदाचित तो थकला असावा” असं श्रीकांत म्हणाले. “बुमराहमध्ये तो जोश दिसत नाहीय. (Jasprit Bumrah) त्यांचा एक चेंडू धोकादायक वाटत नाही. तो थकला असावा. मी त्याला दोष देत नाहीय. पण तो त्याच्या बेस्ट फॉर्ममध्ये नाहीय. तो खूप प्रयत्न करतोय पण सामान्य वाटतोय” असं श्रीकांत म्हणाले. विकेट मिळत नसले तरी मुंबईच्या बॉलर्समध्ये त्याचा इकोनॉमी रेट चांगला आहे.

हेही वाचा

उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट

कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा

कोहिनूर हीरा पुन्हा भारतात येणार