भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस उष्णता कायम राहणार आहे. राज्यावर दुहेरी संकट बघायला मिळतंय.

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच उष्णता कमालीची वाढत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात आजही उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात आज उन्हाच्या झळा अधिक तीव्र असतील.(state) त्यामध्येच काही भागात पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. यासोबतच मे महिन्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. 5 मे पर्यंत मुंबईत उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील जवळपास जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. आज उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज आहे. या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना काही सूचना जारी करण्यात आल्यात. अतिमहत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच.
गोंदिया जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा कायम असतानाच भारतीय हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. मागील दोन दिवस तापमान 43 ते 44 अंशांवर होते, तर सध्या ते 42 अंशांवर आले आहे… ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहणार असून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
कधी उष्णता तर कधी पाऊस यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुलांच्या कोचिंग क्लासेसच्या वेळांमध्येही बदल करण्यात आला. (state) यासोबतच गेल्या काही दिवसांपासून उष्णघाताच्या रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. काही भागात कडाक्याचे उन्ह तर काही भागात पाऊस अशी स्थिती राज्यात आहे. झारखंडसह अन्य राज्यात पावसाचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सततचा पाऊस तसेच त्यानंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्याने यंदा तब्बल 70 टक्क्यांपर्यंत द्राक्षांचे उत्पादन घटल्याचे चित्र पाहायला मिळाले. (state) त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचा आर्थिक कणा अक्षरशः मोडला असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा युरोप व नॉन-युरोप देशांमध्ये सुमारे 35 टक्क्यांनी द्राक्ष निर्यात घटली आहे तर बांगलादेश आणि नेपाळ या प्रमुख बाजारपेठांमध्ये 70 ते 80 टक्क्यांपर्यंत निर्यात घट झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
हेही वाचा
मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी
मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?
गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल