इतिहासात पहिल्यांदाच गोकुळवर प्रशासक!, सत्ताधारी सतेज पाटील आणि मुश्रीफांना राजकीय धक्का

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मंगळवारी (५ मे) संपत असल्याने संघावर प्रशासक नियुक्तीची शक्यता निर्माण झाली आहे. (Milk Producers) सहकार कायद्यातील नव्या तरतुदीनुसार संचालक मंडळाची मुदत संपताच प्रशासक नेमण्याची प्रक्रिया राबवावी लागणार असल्याने सोमवारी (४ मे) सायंकाळपर्यंत आदेश निघू शकतात.

गेल्या आठवड्यात कोल्हापूर सर्किट बेंचने १२०८ संस्थांवरील याचिकेचा निकाल लागेपर्यंत गोकुळची निवडणूक घेऊ नये, असे आदेश दिले होते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाल्यानंतर आता प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. संघावर एक सदस्यीय की तीन सदस्यीय प्रशासक मंडळ नेमले जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. तीन सदस्यीय मंडळ नेमल्यास अध्यक्षपदी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि दुग्ध विभागाशी संबंधित दोन अधिकाऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, राजकीय स्तरावरही हालचालींना वेग आला असून काही इच्छुकांनी प्रशासक मंडळात संधी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि पालकमंत्री Prakash Abitkar यांच्या माध्यमातून लॉबिंग सुरू असल्याचे बोलले जात आहे. जर राजकीय प्रशासक मंडळ नेमण्याचा निर्णय झाला, तर Shiv Sena, Bharatiya Janata Party, Nationalist Congress Party आणि Jansurajya Shakti या पक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता प्रशासन कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?