डॉक्टर महिला घरात एकटी, ओळखीच्या तरूणाकडून बलात्कार; मोबाईलवर शूट करून दिली धमकी, कोल्हापुरात धक्कादायक घटनेने खळबळ

कोल्हापुरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात एकटी असलेल्या विवाहित महिलेशी ओळखीच्या तरुणाने जबरदस्ती करून बलात्कार केल्याचा आरोप समोर आला आहे. (shocking incident) एवढ्यावरच न थांबता आरोपीने संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण केले आणि नंतर तो व्हिडिओ महिलेच्या मोबाईलवर पाठवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

पीडितेच्या तक्रारीनुसार, ३० एप्रिल रोजी दुपारी महिला घरात एकटी असताना आरोपी शक्ती विक्रम भोसले (वय २८, रा. शाहूपुरी, कोल्हापूर) तिच्या घरी आला. त्याने जबरदस्ती करत अत्याचार केला. महिला आरडाओरडा करू लागल्यावर आरोपीने तिचे तोंड दाबून धरले आणि ही घटना कोणाला सांगितल्यास तिला व तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेमुळे महिला प्रचंड मानसिक धक्क्यात गेली होती. दोन दिवस ती घराबाहेरही पडली नाही. दरम्यान, १ मे रोजी रात्री आरोपीने पीडितेच्या मोबाईलवर त्या अत्याचाराचा व्हिडिओ पाठवला. त्यानंतर फोन करून व्हिडिओ डिलीट करायचा असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.

या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने अखेर राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत आरोपी शक्ती भोसले याला अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?