अजितदादांच्यानंतर सुनेत्राताईंची जबाबदारी! अजित पवारांचे आतापर्यंतचा विक्रम सुनेत्रा पवार मोडणार, “मॅजिक फिगर” गाठणार

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या विक्रमी मताधिक्य मिळवणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (political atmosphere) महायुतीकडून मोठ्या विजयाचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष निकालासाठी मोठे गणित पूर्ण करावे लागणार आहे.

या पोटनिवडणुकीत एकूण २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये तब्बल १ लाख ६५ हजार मतांचे मताधिक्य मिळवायचे असेल, तर एका उमेदवाराला किमान १ लाख २३ हजार २६५ मते मिळणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या “मॅजिक फिगर”पर्यंत पोहोचतात का, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचा एकही ताकदीचा प्रतिस्पर्धी उमेदवार मैदानात नसल्याने लढत मोठ्या प्रमाणात एकतर्फी झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे महायुतीच्या दाव्याला अधिक बळ मिळाले आहे. मात्र, मतदारांचा कौल, मतदानाची टक्केवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील आकडेवारी यावरच अंतिम निकाल ठरणार आहे.

बारामती मतदारसंघ हा राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे येथे घडणारा प्रत्येक राजकीय निकाल आणि प्रत्येक विक्रम राज्यभर चर्चेचा विषय ठरतो. आता सुनेत्रा पवार या ऐतिहासिक मताधिक्याचा नवा विक्रम नोंदवतात का, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?