रातोरात बंद झाली 34 वर्ष जुनी सर्वात मोठी एअरलाईन कंपनी

अमरिकेतील 34 वर्ष जुनी सर्वात मोठी एअरलाईन कंपनी रातोरात बंद झाली आहे.(airline)या कंपनीत कार्यरत असलेल्या 17,000 लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अमेरिकन विमान कंपनी ‘स्पिरिट’ आपले कामकाज बंद करण्याची घोषणा केली. ‘स्पिरिट’ ही अमेरिकेतील एक कमी बजेटमध्ये विमानसेवा देणारी लोकप्रिय विमान कंपनी आहे. ‘स्पिरिट’ कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. सरकारकडून आवश्यक आर्थिक मदत न मिळाल्याने कंपनी बंद झाली आहे’स्पिरिट’ कंपनी मागील 34 वर्षांपासून कार्यरत आहे. अत्यंत कमी खर्चाची विमानसेवा देणाऱ्या स्पिरिट एअरलाइन्सने 34 वर्षांनंतर तात्काळ प्रभावाने आपले कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सर्व उड्डाणे रद्द केली असून ग्राहक सेवाही थांबवण्यात आल्याचे जाहीर केले. प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत केले जातील, परंतु प्रवासाची कोणतीही पर्यायी व्यवस्था केली जाणार नाही असे कंपनीने एका निवदनाद्वारे जाहीर केले.


राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतिम प्रस्ताव देऊनही कंपनीला वाचवण्यासाठी(airline) सरकारी मदत मिळू शकली नाही. वाढत्या इंधन किमती आणि इराण युद्धाच्या परिणामामुळे कंपनी आर्थिक संकटात सापडली होती. कंपनी दिवाळखोरीचा सामना करत होती. अखेरीस कंपनीने सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. कंपनी बंद झाल्याचा सर्वात मोठा फटका कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे. सुमारे 17,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

इराण आणि अमेरिका इस्त्रायल युद्धामुळे कामकाज बंद करणारी ही पहिली अमेरिकन एअरलाइन आहे. कंपनीला सरकारी आर्थिक मदत मिळवण्यात अपयश आले. स्पिरीट एअरलाइन कंपनीचा बाजारातील वाटा 5 टक्के आहे. मागील दोन दशकांत अमेरिकेत बंद होणारी ही पहिली मोठी एअरलाइन आहे. युद्ध सुरू झाल्यापासून जेट इंधनाच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. एअरलाइनच्या परिचालन खर्चापैकी जवळपास निम्मा खर्च हा एटीएफवर होतो. स्पिरिट एअरलाइन्स बंद होणे हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठीही एक मोठा धक्का आहे. ट्रम्प यांनी एअरलाइनसाठी 500 दशलक्ष डॉलर्सच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव दिला होता, ज्याला त्यांच्या काही जवळच्या सल्लागारांनी आणि काँग्रेसमधील काही रिपब्लिकन सदस्यांनी विरोध केला होता. कंपनीला सरकारच्या आर्थिक मदत योजनेसाठी कर्जदारांचा पाठिंबा मिळवण्यात अपयश आले.

अनेक प्रमुख विमान कंपन्यांकडून स्पर्धा असूनही, स्पिरिटने देशात विमान (airline)तिकिटांचे दर कमी ठेवले. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विमान कंपनी वाचवण्याबाबत एकमत होऊ शकले नाही. स्पिरिटने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीच्या प्रयत्नांनंतरही, तेलाच्या किमतीतील अलीकडील वाढ आणि इतर व्यावसायिक दबावांमुळे स्पिरिटच्या आर्थिक स्थितीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. “या परिस्थितीत, आमच्याकडे कामकाज थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही,” असं कंपनीने निवदेनात म्हंटले आहे.

सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत असं कंपनीने जाहीर केले.(airline) प्रवाशांनी बुकिंग केले असल्यास विमान पकडण्यास विमानतळावर जाऊ नये. सर्व उड्डाणे तडकाफडकी रद्द करण्यात आली आहेत. इराण युद्धामुळे जगात भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. होर्मुज सामुद्रधुनी मार्ग बंद झाला आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला आहे. कारण जगातील 20 टक्के च्चे तेल याच मार्गावरून जाते. शिवाय, अनेक देश थेट आखाती देशांकडून एटीएफ खरेदी करतात. यामुळेच अलीकडे एटीएफच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. कोविड-19 महामारीनंतर हवाई प्रवास उद्योगासमोरील हे सर्वात मोठे संकट मानले जात आहे.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?