सर्वात मोठी नोकरकपात? क्षणात 12000+ भारतीयांच्या नोकऱ्या जाणार?

आर्टिफिशीअल इंटेलिजन्स म्हणजेच एआय लवकरच लोकांच्या नोकऱ्या खाणार (Indians) अशी चर्चा तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकली असेल किंवा त्याबद्दल वाचलं असेल. खास करुन माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एआयचा सर्वात मोठा फटका बसणार असून अनेकांच्या नोकऱ्यांवर भविष्यात गदा येणार असं सांगितलं जात होतं. मात्र हे भविष्य आता वर्तमानात बदललं असून लवकरच भारतामधील अव्वल कंपन्यांपैकी एक मल्टीनॅशनल आयटी कंपनी मोठी नोकरकपात करणार असून याचा सर्वाधिक फटका भारतीय कर्मचाऱ्यांना बसणार आहे. भविष्यात एआय आणि ऑटोमेशनकडे वळण्याच्या उद्देशाने अनेक कंपन्या काही धोरणात्मक निर्णय घेत असून याचाच एक भाग म्हणून ही दिग्गज कंपनी 12 ते 15 हजार कर्मचऱ्यांना नारळ देणार आहे.

ज्या कंपनीबद्दल आपण बोलतोय ती नोकरी देण्याच्याबाबतीत भारतामधील (Indians) तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. चेन्नई, हैदराबाद, बंगळुरु आणि मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र असलेल्या या कंपनीचं नाव आहे, कॉग्निझंट! 1994 मध्ये भारतात सुरु झालेली कॉग्निझंट कंपनी 1997 मध्ये कायमची अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये शिफ्ट झाली असून आज या कंपनीचं मुख्यालय अमेरिकेतच आहे. हीच कंपनी आता जागतिक स्तरावर 12 ते 15 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणार आहे. यातील बहुसंख्य नोकरकपात ही भारतात होणार असल्याचं ‘मनी कंट्रोल’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. कॉग्निझंटमधील ही नोकरकपात कंपनीच्या नवीन ‘प्रोजेक्ट लीप’ धोरणाअंतर्गत होणार आहे. कॉग्निझंट ‘प्रोजेक्ट लीप’च्या माध्यमातून एआय आणि ऑटोमेशनकडे वळण्यासाठी कर्मचारी संख्येत कपात करत आहे.

कॉग्निझंटमध्ये जागतिक स्तरावर एकूण 3.57 लाख कर्मचारी काम करतात. त्यापैकी बहुत म्हणझेच साधारण 2.56 लाख कर्मचारी भारतात आहेत. 15 लाख रुपयांपर्यंत सरासरी वार्षिक पगार असलेल्यांची छाटणी होणार असल्याचं वृत्त आहे. 15 लाख वार्षिक पगार गृहित धरला तर सहा महिन्यांचा सेवरन्स पॅकेज म्हणजेच साधारणपणे प्रती कर्मचारी साडेसात लाख रुपये देऊन कर्मचाऱ्यांसोबतचा करार संपुष्टात आणण्याचा कंपनीचा विचार आहे. असं झालं तर एकट्या भारतात कॉग्निझंटमधील 12 ते 13 हजार भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॉग्निझंटने 2026 मध्ये कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांचा अगाऊ पगार(Indians) देऊन त्यांना नोकरीवरुन कमी करण्याचा निर्णय घेण्याच्या उद्देशाने 230 मिलियन ते 320 मिलियन अमेरिकी डॉलर्सचं बजेट बाजूला काढून ठेवल्याचं वृत्त आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 1900 ते 2600 कोटी रुपये इतकी होते. यातील 200 मिलियन ते 270 मिलियन अमेरिकी डॉलर्स सेवरन्स आणि कर्मचारी-संबंधित खर्चासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यासाठी फायनल सेटलमेंट म्हणून बाजूला काढण्यात आलेल्या या रक्कमेपैकी 2566 कोटींहून अधिक रक्कम कंपनीने आधीपासूनच तयार ठेवली आहे.

कॉग्निझंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ रवी कुमार एस यांच्या नेतृत्वात कंपनी ‘लीनर पिरॅमिड’ मॉडेलकडे वाटचाल करत आहे. लीनर पिरॅमिड मॉडेलमध्ये मानव आणि तंत्रज्ञानाचा नोकरदार म्हणून वापर करण्यावर भर असणार आहे. यामध्ये एआय आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून कंपनी आता डिजिटल लेबर म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या जागी डिजीटल नोकरदार वापरण्याच्या तयारीत आहे. ह्युमन लेबर म्हणजेच कर्मचारी आणि डिजीटल लेबर म्हणजेच एआय यांचं मिश्रण करून मधल्या फळीतील कर्मचारी संख्या कमी करण्याचा कंपनीचा मानस आहे. कॉग्निझंट कंपनीने अद्याप अधिकृतपणे नोकरकपात जाहीर केलेली नाही, पण ‘प्रोजेक्ट लीप’च्या घोषणेनंतर आयटी क्षेत्रामध्ये कॉग्निझंटमधील नोकरकपातीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

कॉग्निझंटच्या या निर्णायाचा परिणाम मुख्यतः मिड-लेव्हल कर्मचाऱ्यांवर होणार आहे. हे असे कर्मचारी असतील ज्यांच्या भूमिका एआय अगदी सक्षमपणे पार पाडू शकतं. कंपनीने यापूर्वीही छोट्या प्रमाणात नोकरकपात केली होती, पण भविष्यात येऊ घातलेली ही नोकरकपात फार मोठी आहे. कर्मचाऱ्यांना सेवरन्स, आउटप्लेसमेंट सपोर्ट देण्याची कॉग्निझंटची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर आणि ब्लाइंड, रेडिटसारख्या कर्मचारी फोरम्सवर याबाबत चर्चा सुरु झाली आहे. आयटी क्षेत्रातील नोकरीच्या अनिश्चिततेचा मुद्दा या प्रकरणामुळे पुन्हा अधोरेखित होत आहे.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?