राज्यातील वाहनधारकांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे.(owners)सुरुवातीला त्याची मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत दिली होती, मात्र नंतर ती टप्प्याटप्प्याने वाढवली आणि आता त्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ ही निश्चित करण्यात आली आहे. पण त्यानंतरही वाहनावर HSRP नसेल तर कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. परिवहन विभागाने नागपूर जिल्ह्यामधील वाहनांची आकडेवारी पाहिली असून, तीन आरटीओ कार्यालयात एकूण १४ लाखांहून जास्त वाहने नोंदणीकृत आहेत. यापैकी सहा लाख वाहनांनी HSRP साठी नोंदणी केली असून, पाच लाखांपेक्षा जास्त वाहनांवर या प्लेट बसवण्यात आल्या आहेत. तरीही अर्ध्यापेक्षा जास्त वाहनधारकांनी अजूनही पाट्या बसवून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

नागपूर शहरात ४,३७,३१३ वाहनांपैकी केवळ १,५६,१२१ वाहनांना HSRP बसवण्यात आल्या आहेत. याआधी नागपूर मध्ये ४,३५,१६० पैकी १,६३,९९० वाहनांना, तर ग्रामीण भागात ५,६३,००० पैकी २,००,००० वाहनांना नवीन नंबर प्लेट लावल्या आहेत. यावरून असं दिसतं की अजून मोठ्या प्रमाणात वाहनधारकांनी ही अट पूर्ण करणे बाकी आहे.(owners)परिवहन विभागाने वाहनधारकांना दिलासा देत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी नेहमीप्रमाणे फिटमेंट सेंटरला जायला लागणार नाही. जर एकाच सोसायटीमधील किंवा एकाच ठिकाणच्या किमान २५ किंवा त्यापेक्षा अधिक वाहनधारकांनी एकत्रितपणे मागणी केली, तर त्यांच्यासाठी संबंधित एजन्सी थेट त्या सोसायटीमध्ये किंवा सोयीच्या ठिकाणी पाट्या बसवून देईल. यासाठी कोणतेही जास्तीचे पैसे आकारले जाणार नाहीत.

राज्यात या प्रक्रियेला गती देण्यासाठी फिटमेंट सेंटरची संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, वाहन वितरकांना ही जबाबदार धरण्यात आले असून, नवीन नोंदणी झालेल्या कोणत्याही दुचाकी, चारचाकी किंवा इतर कोणत्याही वाहनाला HSRP शिवाय वितरित केल्यास त्यांच्यावर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई होईल, असा आदेश जारी करण्यात आला आहे.याशिवाय, HSRP लावल्याने बनावट नंबर प्लेट शी संबंधित गुन्ह्यांवर आळा बसेल, वाहतूक सुरक्षेला चालना मिळेल आणि वाहन चोरीच्या घटनांमध्येही कमी होईल, असा विश्वास परिवहन खात्याने व्यक्त केला आहे. HSRP नंबर प्लेट ही केवळ नियमावली नसून वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची बाब आहे. (owners)३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत लक्षात घेता, सर्व वाहनधारकांनी वेळेत नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे. अन्यथा, कारवाईला सामोरे जावे लागेल

हेही वाचा :

भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही

…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….

परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं