नवरात्र सुरु आहे. नवरात्रीत नऊ दिवस गरबा-दांडिया खेळला जातो. (played)नऊ दिवस सर्वजण देवीची भक्तीभावाने पूजा करतात. अनेक ठिकाणी रात्री गरबा खेळला जातो. दरम्यान, आज वीकेंड असल्यामुळे गरबा खेळायला खूप गर्दी असणार आहे. त्यामुळेच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुढचे तीन दिवस रात्री १२वाजेपर्यंत गरबा-दांडिया खेळता येणार आहे.नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे. यामध्ये नवरात्रीत सप्तमी, अष्टमी आणि नवमी म्हणजे २९,३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी दिली आहे.

यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे.सध्या रात्री फक्त १० वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी आहे. रात्री १० वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवनागी असल्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. (played)त्यामुळेच आता गरबा प्रेमींसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पुढचे तीन दिवस रात्री १२ पर्यंत दांडिया खेळता येणार आहे.यासाठी काही अटीदेखील निश्चित करण्यात आल्या आहे.

उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही परवानगी लागू होणार नाही.ध्वनी प्रदूषण नियम, 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करणे आवश्यक राहील. (played)अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल.मुंबई उपनगर जिल्ह्याच्या वेबसाइटवर हा आदेश प्रकाशित करण्यात आला आहे. यानुसार सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तीन दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत नियमांचे पालन करुन गरबा खेळता येणार आहे. मात्र, गरबा खेळताना आवाजाची मर्यादा ठरवण्यात आली आहे. त्याचे पालन करायचे आहे.

हेही वाचा :

भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही

…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….

परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं