फिफाने जिओस्टारची 190 कोटी रुपयांची ऑफर फेटाळली!

भारतामध्ये फुटबॉलची क्रेझ काही कमी नाही. हा खेळ खेळणारे (rejects) आणि फॉलो करणारा एक वेगळाच वर्ग आहे. आता हे फुटबॉल प्रेमी आतुरतेने फिफा वर्ल्ड कप 2026 ची वाट बघत आहेत. पण स्पर्धेची उत्सुकता जगभरात वाढत असताना भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी मात्र एक निराशाजनक स्थिती निर्माण झाली आहे. फिफा वर्ल्ड कप 2026च्या प्रसारण हक्कांबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. फुटबॉल चाहत्यांसाठी ही मोठी बातमी ठरत आहे, कारण स्पर्धा सुरू होण्यास फारसा वेळ शिल्लक नसतानाही अधिकृत ब्रॉडकास्टर ठरलेला नाही. 11 जूनपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून 19 जुलैला अंतिम सामना खेळला जाणार आहे. यावेळी प्रथमच 48 संघ एकाच ट्रॉफीसाठी स्पर्धेत उतरतील, त्यामुळे हा वर्ल्ड कप अधिक मोठा आणि रोमांचक ठरणार आहे. फिफाने जिओ स्टार कडून आलेली सुमारे १९० कोटी 20 मिलियन डॉलर ची ऑफर सध्या नाकारली आहे. त्यामुळे भारतातील प्रसारण हक्क अजूनही प्रलंबित आहेत.

भारतात या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण कोण करणार, याबाबत अजूनही (rejects)कोणताही निर्णय झालेला नाही. फिफाने जिओ स्टारकडून आलेली ऑफर स्वीकारलेली नाही. त्यामुळे अधिकृत ब्रॉडकास्टिंग हक्क अद्याप विकले गेलेले नाहीत. सोनी सोबतही चर्चा झाली होती, पण त्यांनीही बोली लावण्यापासून माघार घेतली आहे. यामुळे भारतातील लाखो फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या तरी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग निश्चित झालेले नाही.

अशा परिस्थितीत प्रसार भारती अंतर्गत डीडी स्पोर्ट्सवर सामने दाखवले जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे, पण त्याबाबतही अधिकृत घोषणा झालेली नाही.याआधी Viacom18 ने फिफा विश्वचषक 2022 चे प्रसारण Sports18 आणि JioCinema वर केले होते. त्या वेळी त्यांनी 300 कोटी रुपयांहून अधिक जाहिरात महसूल कमावला होता. त्यामुळे यावेळीही मोठी स्पर्धा अपेक्षित होती, पण सध्याची परिस्थिती वेगळी दिसत आहे.

फक्त भारतच नाही, तर चीन मध्येही प्रसारण हक्कांबाबत स्पष्टता नाही. (rejects)अजूनपर्यंत तिथेही कोणतीही अधिकृत डील जाहीर झालेली नाही. विशेष म्हणजे, 2022 वर्ल्ड कपदरम्यान डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहिलेल्या एकूण वेळेत जवळपास 50% वाटा चीनचा होता, ज्यामुळे त्या बाजाराचे महत्त्व अधोरेखित होते.स्पर्धेच्या फॉरमॅटमध्येही यावेळी मोठा बदल पाहायला मिळणार आहे. 48 संघांना गटांमध्ये विभागले जाईल आणि प्रत्येक गटातील अव्वल संघांना पुढच्या फेरीत प्रवेश मिळेल. त्यानंतर राउंड ऑफ 32, राउंड ऑफ 16, उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम अशा टप्प्यांतून विजेता ठरणार आहे. एकूणच, स्पर्धा जवळ येत असताना भारतात प्रसारणाबाबत अजूनही अनिश्चितता असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकतेसोबतच चिंता देखील वाढत आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार

महाराष्ट्रात संतापजनक प्रकार! भोंदूच्या नावाखाली १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; उपचाराच्या बहाण्याने

नसरापूर प्रकरण 2 प्रकरणातून निर्दोष सुटका होताच आरोपीने केली भयंकर गोष्ट, ज्यामुळे तपासात अडथळे